सध्या पायापासून ते मेंदूपर्यंत प्रचंड वेगाने पसरणाऱ्या एका रोगाचे नाव खूप चर्चेत आहे त्याचे नाव आहे माय”क्रो”सि”स किंवा काळी बुरशी रोग. हा आजार काय आहे? आणि हा आजार आता जास्त का होतोय? कोणत्या लोकांना या आजाराचा जास्त धोका आहे आणि हा आजार होऊ नये म्हणून काय आयुर्वेदिक उपाय करता येईल या विषयीची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय केल्याने तुम्हाला या आजाराविषय ची भीती अजिबात राहणार नाही आणि या आजाराविषयी काय खबरदारी घ्यायची आहे ते पण आपल्याला समजणार आहे. आपल्याला माहिती आहे की बुरशी चा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र शास्त्र आहे ज्याला मयक्रोबालॉजी म्हणतात. यामध्ये सर्व प्रकारच्या बुरशीचा अभ्यास केला जातो.
बुरशी पासून अनेक पदार्थांची निर्मिती केली जाते. वाइन बनवली जाते, सोया सॉस बनवला जातो हे सुद्धा बुरशीपासून बनवले जातात तेव्हा सगळ्या बुरशी या घातक असतात असे नाही..बुशी या काही घातक असतात त्याचे परिणाम प्रत्येकाला प्रत्येकाच्या शरीरावर दिसू लागतात. आपल्या शरीरामध्ये पहिल्यापासूनच बुरशी असते परंतु त्याचा जो परिणाम आपल्याला हळूहळू जाणवू लागतो.
वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीराच्या विविध भागांवर बुरशी निर्माण होत असते आणि परिणामी आपल्याला त्याचा सामना करावा लागतो. ही बुरशी प्रामुख्याने आपल्या शरीरावर, मांड्यांमध्ये जांघामध्ये पाहायला मिळते. हे सारे प्रामुख्याने फंगल इन्फेक्शन मुळे होते आणि म्हणूनच आपल्याला अंगावर लाल च, गाठी निर्माण होणे यासारख्या समस्या उद्भवत असतात.
आपल्या शरीरातील ज्या ठिकाणी ग्लुकोज किंवा विषारी व टाकाऊ पदार्थ जास्त प्रमाणात असलेले असतात अशा ठिकाणी हि बुरशी साचलेली असते. या बुरशी चा सर्वांनाच त्रास होतो असे नाही. ज्या व्यक्तींना खूप दिवसापासून ऑक्सीजन लावलेला आहे त्या लोकांना या गोष्टीचा त्रास होतो. तसे पाहायला गेले तर बुरशी ही ऑक्सीजिवी आहे.
ज्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते अशा ठिकाणी ही बुरशी खूप मोठ्या प्रमाणावर वाढते म्हणूनच बंद असलेला वातावरण मध्ये बुरशी वाढत नाही ज्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते अशा ठिकाणी ही बुरशी वाढते आणि हीच बुरशी वाढू नये यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. बुरशी ही प्रामुख्याने ज्या ठिकाणी दमट ओलसर वातावरण असते अशा ठिकाणी बुरशीची वाढ झटपट होत असते. यासाठी आपल्याला कडूलिंबाचे पाणी घ्यायचे आहेत.
कडुलिंबाच्या पाण्यामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात यामुळे आपल्या शरीरामध्ये जर कोणत्या प्रकारे विषारी घटक असतील तर ते घटक बाहेर पडण्यासाठी मदत होतात. सर्वप्रथम आपल्याला हे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. जर या पानावर कोणत्याही प्रकारचे विषारी घटक असेल तर त्यामुळे निघून जाते त्यानंतर आपल्याला दोन-तीन पाने चावून चावून खायची आहे, असे केल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहेत बाहेर ते निघून जातील.
या बुरशीची वाढ होऊ नये म्हणून आपल्याला नाकाची स्वच्छता ठेवणं सुद्धा अत्यंत गरजेचे आहे यासाठी आपल्याला कडुनिंबाची पाने घ्यायची आहेत आणि एका पातेल्यामध्ये टाकून पाणी चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे त्यानंतर पाणी थंड झाल्यावर या पाण्यामध्ये आपल्याला नाक बुडवून थोडावेळ तसेच ठेवायचे आहे,असे केल्याने आपले नाक सुद्धा स्वच्छ होईल व नाकामध्ये जर काही जीव-जंतू असतील ते सुद्धा या पाण्यामुळे मृत्यू पावतील आणि अशाप्रकारे तुमच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे फंगल इन्फेक्शन असेल तर ते फंगल इन्फेक्शन दूर होण्यासाठी मदत होईल.
हा उपाय साधा सोपा असला तरी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचा मानला गेलेला आहे म्हणून घरच्या घरी उपाय करून आपल्या शरीरामध्ये जर कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झालेले असेल व कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा त्रास तुम्हाला होत असेल तर हा त्रास आवश्यक दूर करा म्हणून हा उपाय करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.