दृष्टीकोन: ती इतकी मोहक सुंदर असून देखील; बघायला येणारा प्रत्येक मुलगा तिला नकार देत होता.. एक हृदयस्पर्शी कथा

जरा हटके

आज सीमाच्या घरी तिला बघण्याचा कार्यक्रम होता. पण प्रत्येक वेळी होणाऱ्या या कांदेपोहेच्या कार्यक्रमाला सीमा कंटाळलेली होती, कारण आज तिला बघायला पाचवा मुलगा येणार होता, याशिवाय आधीच्या चार मुलांनी काहीतरी शिल्लक कारण सांगून नकार दिला होता, त्यामुळे तिला याचा कंटाळा आला होता, पण आपल्या आईच्या इच्छेसाठी ती तयार झाली होती,

तेवढ्यात, यातून मुलाचे येण्याची वाट बघत असताना निरोप आला की, तो बघायला येणारा मुलगा आत्ताच लग्न नाही करणार, त्यामुळे तो येऊ शकत नाही, असा निरोप आल्याने, तिच्या आई-वडीलांना सीमाचा लग्नाची आणखीन चिंता वाटू लागली. कारण सीमाला एकही वाईट गुण नव्हता, तसेच ती पुर्ण संस्कारी मुलगी होती. त्यामुळे तिच्या मध्ये काहीच नाव ठेवण्यासारखं नव्हते.

याशिवाय ती खूप सुंदर होती. तसेच सीमाचा का-यद्याचे शिक्षण घेतले असल्याने, ती सध्या एका अनुभवी वकिलाकडे प्रॅक्टिस करत होती. तसेच ती अन्नपूर्णा असल्याप्रमाणे, जेवणही करीत होती. त्यामुळे घर कामातही, तिचा हात कोणीच धरत नव्हता,ती पूर्ण सर्वगुणसंपन्न होती.

त्यामुळे सगळीकडे येणारी नकारघंटामुळे सीमाचे आई प्रतीक्षा खूप परेशान झाली होती, तेव्हढ्यात प्रतिक्षाची नणंद घाईघाईत घरी आली आणि प्रतीक्षाला म्हणायला लागली की,” वहिनी भोग आत्ता आपल्या कर्माची फळं, लोक तुम्हाला नाव ठेवत आहेत,कारण भांडकुदळ आईच्या, मुलीशी कोण लग्न करणार?

हे वाचा:   बायको आई आणि बहिणीला नवऱ्याशी शारीरिक संबंध ठेवायला लावते, म्हणाली: यात काय अडचण आहे, प्रत्येकजण…

कारण आई कसा भांडकुदळ असेल तर तिची मुलगीही तशीच असेल. त्यावर प्रतीक्षा म्हणाली की,काय मी आणि भांडकुदळ, काही काय म्हणताय ,मी कधी कुणाशी भांडले?.तेव्हा नणंद म्हणाली की, “अ’फवा नाही वहिनी “, कारण सुरुवातीला तुम्ही जे माझ्या भावाशी आणि माझ्या आई-वडिलांची वागलात,ते लोक विसरले नाहीत अजुन”,

तेव्हा प्रतिक्षाला एकदम भूतकाळात आठवलं, तिला लग्नानंतरचे अगदी सुरवातीचे दिवस, म्हणजे जेव्हा लग्न झालं होतं, तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी खरा रंग दाखवायला सुरुवात केला होता. तसेच तिचा नवरा अमोल ही कधीकधी दारू पिऊन मा र हा ण करीत असे, खूप काम करायला लावत होते, तिला सासरी खुप त्रास दिला जात असे, याशिवाय तसे प्रतिक्षाने ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते, पण लग्नानंतर ती नोकरी करणार नाही, असे ठरले होते.

त्यातच सीमाचा ज न्म झाला आणि सीमाला शाळेत घालायची वेळ आली तेव्हा तिचे ऍडमिशन करण्यासाठी,घरी पैसे नव्हते. मग घराची गरीब परिस्थिती काही सुधारत नसल्याने, प्रतिक्षाने नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या टायपिंग कौशल्यामुळे आणि योग्य शिक्षणामुळे तिला लगेच नोकरी मिळाली.

हे वाचा:   लग्नाला ३ वर्ष होऊन गेले तरी मूल होत नव्हते.. शेवटी या स्त्रीने वैतागून उचलले हे पाऊल.. आज तिच्यासोबत..

मग काही काळातच, प्रतीक्षाच्या नोकरीमुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारली, त्यामुळे घरातील अमोल आणि सासू-सासरे तिच्याशी चांगली वागु लागले. एकंदर वातावरण खूप सुधारली होती, हा भयंकर भूतकाळ आठवुन, प्रतिक्षा आपल्या नणंदला म्हणाली की,”तुम्ही तर माझा लढा स्वतःच्या डोळ्यांनी पहिला असल्याने, तुम्हाला असं वाटतं की, मी पण भांडकुदळ वाटते.

त्यावर सीमा म्हणाली की, “लोकांचा दृष्टिकोन कसा असो, तरीही मला माझ्या आईवर गर्व आहे” आणि जो मुलगा आणि त्याच्या घरातील मंडळी माझ्या आईचा मान ठेव त्याच्याशीच मी लग्न करेन असे ती ठामपणे म्हणाली. तेव्हढ्यात त्यांच्या घराची घंटी वाजली,आणि दरवाज्यामध्ये प्रतीक्षाच्या माहेरी राहणारे शेजारचे जोडपे,त्याच्या मुलगा दीपकसाठी सीमाचा हात मागण्यास, आले होते. मग सीमा आणि दिपकने लग्न थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *