आपल्या आजूबाजूला खूप सारी नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करत असते. या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या जीवनावर देखील होत असतो. आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये सतत भांडण कटकटी वादविवाद होत असतात. घरातील सदस्य एकमेकांशी भावनेने वागत असतात. वारंवार भांडण झाल्याने घरात ताण निर्माण होतो. नेहमी संकटे एकामागून एक येतच राहतात .अडचणी वाढत असतात. जर तुमच्या जीवनात सुद्धा अशाच काही नकारात्मक ऊर्जा वारंवार येत असतील तर आपल्याला यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे ,अन्यथा भविष्यात आपल्याला खूप सार्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
जर तुमच्या जीवनामध्ये नेहमी अडीअडचणी नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर रविवारी रात्री झोपताना आपल्याला एक पाण्याचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक नकारात्मक गोष्टी दूर होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदेल त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की, ज्या ठिकाणी खूप भांडण असतात अशा ठिकाणी माता महालक्ष्मी कदापि वास्तव्य करत नाही आणि त्या घरांमध्ये नेहमी कंगाली आणि दरिद्रता निर्माण होत असते. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सगळी संकटे नष्ट होणार आहेत, चला तर मग जाणून घेऊया या आजच्या उपाया बद्दल..
घरातील नकारात्मक ऊर्जा मुळे आपल्या व्यवसायात उद्योगधंद्यामध्ये प्रगती होत नाही. माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. माता महालक्ष्मी ला बंधन होते आणि यामुळे घरात आलेला पैसा वारंवार बाहेर निघून जातो तसेच पैसा घरात येण्याची शक्यता खूपच कमी असते, अशा वेळी आपण चिडचिड करतो, घरात भांडण करत असतो घरातील सदस्यांबरोबर वाद-विवाद करत असतो. आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो आपल्याला रविवारच्या दिवशी करायचा आहे.
हा उपाय आपण 1,3,5,7 अशा प्रकारे करू शकतो. हा उपाय अतिशय साधा सोपा व तितकाच प्रभावी आहे.हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहे. रात्री झोपताना आपल्याला एक ग्लासभर पाणी लागणार आहे किंवा मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल लागणार आहे.या दोन्ही तेलाच्या साहाय्याने किंवा दोघांपैकी एका तेलाच्या साह्याने आपल्या दिवा प्रज्वलित करायचा आहे.
आता आपल्या एका ग्लासमध्ये पाणी भरून द्यायचे आहे आणि या पाण्याद्वारे आपल्या अंगावरून सात वेळा हा ग्लास उतरवायचा आहे त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा ही आपल्याला अंगावरून सात वेळा उतरवायचा आहे, आता आपल्याला हा दिवा आपल्या घरातील सुपडी मध्ये ठेवायचा आहे. ती सुपडी आणि ग्लास दोन्ही वस्तू घेऊन आपल्या उंबरठ्यावर उभे राहायचे आहे आणि ग्लास व थोडेसे पाणी प्यायचे आहे आणि आता त्यानंतर घराच्या बाहेर पडून रस्त्यावर यायचे आहे जिथे चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी आपल्याला दिवा व ग्लासात पाणी टाकायचे आहे.
जर तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असेल तर अशा वेळी चार रस्ता नसेल तर काळजी करू नका. घराच्या बाहेर काही पावले चालून इमारतीच्या बाजूला ठेवू शकता परंतु दिवा शक्यतो विझणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायला पाहिजे. जर हवेमुळे दिवा विझला तर काही हरकत नाही. चार रस्ता येथे गेल्यावर तुम्ही दिव्या पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आणि ग्लास मधील पाणी च्या आधारे एक रिंगण काढायचे आहे आता आपल्याला ठेवल्यावर तेथे प्रार्थना करायचे आहे आणि म्हणायचे आहे की,हे नकारात्मक ऊर्जा तू आत्तापर्यंत माझ्यासोबत येथे आली आहेस.
आता तू इथेच राहा किंवा तुला जिथे जायचे आहे तिथे जा असे म्हणून आपल्या घरी यायचे आहे. घरी आल्यावर हात-पाय धुऊन देव्हाऱ्याच्या जवळ बसून आपल्या कुल देवतेचे नमन करायचे आहे, अशा प्रकारे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर होईल. तुमच्या जीवनात सुख-शांती लाभेल. तुमच्या घरातील सदस्यांना नेहमी प्रगतिशील मार्ग सापडू लागतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.