सुन व मुलगा दोघेही मोठ्या IT कंपनीत जॉबला होते.. गावाकडे वडील वारले पण या दोघां पती पत्नीनी काय केले ते पाहून तुमचे सुद्धा होश उडतील.. पहा

ट्रेंडिंग

मित्रांनो, सकाळची वेळ होती अमित आणि सुजाताची ऑफिसला जाण्याची खूप घाई गडबड चालू होती. नेहमी प्रमाणे सुजाताने पोळी भाजी करून दोघांचे डबे भरुन ठेवलेले. दोघेही एकाच आय.टी कंपनीत नोकरीला होते. त्यांचा प्रेम विवाह असणार, असा कोणीही कृपया गैरसमज करून घेऊ नये कारण त्यांचा विवाह हा घरच्यांनी ठरवूनच केलेला आहे.

असे हे नवविवाहित जोडपे आपल्या कॅबची वाट पाहत गॅलरीत येरझऱ्या घालत होते. कधी ती इकडे तर कधी तो तिकडे, इकडून तिकडे फेऱ्या घालत होते, कॅब यायला वीस मिनिटाचा अवधी आहे हे माहित असूनही ते दोघे रोजच अशा येरझाऱ्या घालत. इतक्यात अमितचा मोबाईल वाजला. गावातल्याच त्याच्या बालमित्राने फोन केला होता, त्याने तो फोन उचलला.

का रे एवढ्या लवकर फोन केलास ? गावाकडे सगळे ठीक आहे ना? अमितने विचारले. आधी सांग तु कुठे आहेस ? गावाकडे सगळे ठीक आहे पण तुझ्यासाठी दुःखाची बातमी आहे. घरातच आहे, काय सांगतोयस काय झाले ? अमितने विचारले. थोडा थोडा धीर धर सांगतो, पण उभा असशील तर बसुन घे. “हं, सांग. आज पहाटे तुझे आबा गेले रे.” काय..?

”बातमी ऐकून त्याच्या हातातला फोन पडता पडता वाचला. पुढे काहीच ऐकू आले नाही. काय झालं हो? ”सुजाता. “आबा” पुढचे शब्द त्याच्या घशातच विरून गेले. तिने अमितला सावरले, कंपनीत मेल केला आणि गावी जाण्यासाठी कॅब बुक केली. लागणारे कपडे बॅगेत भरले. घराला कुलूप लावून पार्किंगमध्ये जाऊन उभे राहिले. कार सुसाट वेगाने धावत होती, एसी चालू असून ही दोघांना घाम फु’टलेला.

हे वाचा:   घराजवळील ही वस्तू वापरा.. फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील; पुन्हा धान्यात कधीच किडे होणार नाही.!

आठ महिन्याच्या मागे दोघांचा विवाह झालेला. सुजाताला चार महिन्यांपूर्वी अमितच्या कंपनीत नोकरी लागली होती. लग्नानंतर काही दिवस ती सासरीच राहिली. त्या दिवसात तिला आबांची माया कळली. सुन आणि लेकीत कसलाच दुजा भाव केला नव्हता. अनायसे अमितच्या कंपनीतच नोकरी लागल्याचे ऐकून त्यांना किती आनंद झाला होता. अमितलाही फ्लॅट भाड्याने मिळाला.

दोघांचा संसार सुरू झाला. कधी आबा तर कधी अधून-मधून माई येत, मुलाचा संसार बघून जात. त्यांच्यासाठी सुजाता तिसरी मुलगी होती. पंधरा दिवसामागे आबा त्यांच्या नव्या फ्लॅटच्या बुकिंग साठी आले होते. निघताना तिला ठणकावून सांगून गेले. “पोरी, म्होरच्या साली नातू मांडीवं खेळाय पायजे बरं का.” “आबा, तुमचं आपलं कायतरीच असतय” असं म्हणून ती लाजून किचनमध्ये पळाली होती.

अमित आबांचा मोठा मुलगा त्याच्या पाठीवर दोन्ही मुलीच झाल्या. घरची आठ दहा एकर कोरडवाहू आणि एकर सव्वा एकर बागायती शेती होती. पावसाविना शेती नव्हती, तरीही आबांनी खस्ता खाऊन अमितला इंजिनिअर केला. आता थोडी परिस्थिती बदलली होती. गावाजवळून जाणाऱ्या कॅनाॅलचे काम नुकतेच पुर्ण झाले होते. अटलेल्या विहिरीनां पुन्हा ओलावा फु’टला होता.

हे वाचा:   ताजमहालचे हे रहस्य स’रकार आजही लपवते..जाणून घ्या काय आहे..आजही रात्रीच्या वेळी अचानक तिथे..

आता पावसाची वाट पहावी लागत नव्हती, शेती करणे सोईस्कर झाले होते. मुग्धा आता बीसीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे. धाकटी बबिता बारावी पास झाली. आता काही वर्षांपासून अमितचा थोडाफार हातभार होता. आबांच्या आठवणींना उजाळा देत तिनशे किलोमीटर प्रवास कसा झाला कळलाच नाही. आबा अनंतात विलीन झाले होते. आता फक्त आठवणी उरल्या होत्या.

मुग्धा, माई, बबिताची पुर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. बहिणींना चांगले शिकवायचे होते. चांगली स्थळे पाहून त्यांची लग्नं लाऊन द्यायची होती. अनेक कामे त्याच्या डोक्यात होती. आबांचे कार्य झाले, पै-पाहुणे पांगले. अमितचा वाढलेला मुक्काम पाहून माईंनी विचारले. “अमित केव्हा निघणार तुम्ही? “हा निघतोय आता.” असे म्हणून तो दरवाजाकडे गेला.

उंबऱ्यात उपडं पडलेले पायताण सरळ केले. अंगावरचा नवा शर्ट काढून खुंटीला टांगला. आबांचा डगळा सदरा अंगात घातला. डोक्याला आबा सारखी टापरी गुंडाळून त्यांचं पायताण पायात सरकवले. तोपर्यंत स्वयंपाक घरातून कासोटा घातलेली सुजाता डोक्यावर जेवणाची टोपली घेऊन घरा बाहेर पडली. दोघांनी शेताची वाट धरली.. धन्यवाद !

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *