उत्तर प्रदेशमधून एक विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे जेथे सासऱ्याने आपल्या मुलाच्या पत्नीशी लग्न केले होते आणि कोणालाही याबद्दलही माहिती नव्हते. चार वर्षापूर्वी हे दोघे सून आणि सासरे होते आणि आता ते पती-पत्नी झाले आहेत. मात्र,पहिल्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही पकडले आणि त्यांना घेऊन आले. परंतु दोघांनीही लग्नाचे कागदपत्र कोर्टात पोलिसांना दाखविल्याने पोलिसांना त्यांना सोडून दयावे लागले.
प्रकरण उत्तरेकडील बदायूं जिल्ह्यातील दबतोरी चौकी परिसरातील आहे. तिथे एका युवकाने काही दिवसांपूर्वी बिसौली पोलिसात तक्रार दिली होती.2016 मध्ये वजीरगंज भागातील एका मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. दोघे वर्षभर एकत्र राहिले. पुढच्या वर्षी पत्नी वडिलांसोबत कुठेतरी गेली.
तेव्हापासून तो त्या दोघांचा शोध घेत असल्याचे या युवकाने सांगितले . पण बर्याच वर्षांनंतर त्याला समजले की दोघे जण चंदौसी येथे राहत आहेत. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या वडिलांना व पत्नीला पकडले.
पोलिस चौकशी दरम्यान पत्नी तिच्या पहिल्या पतीवर नाराज असल्याचे निदर्शनास आले. लग्नाच्या वेळी तिचा नवरा अल्पवयीन होता.ती तिच्या स्वत: च्या इच्छेनुसार सासऱ्यासोबत गेली.
तिने सांगितले की दोघांचे लग्न झाले आहे आणि आता तिला सासऱ्या पासून दोन वर्षाचा मुलगा देखील आहे. ते दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. गावात बदनामीच्या भीतीमुळे ते चंदौसीमध्ये राहू लागले आहेत, असे त्या महिलेने सांगितले.वृत्तानुसार,मुलगा मजूर म्हणून काम करतो आणि शिक्षित नाही. मात्र, आता अशी चर्चा आहे की पती-पत्नीमधील नाते आता आई-मुलगा झालं आहे.
यापूर्वी या युवकाने आपल्या पत्नी आणि वडिलांची माहिती सार्वजनिक माहितीद्वारे शोधली होती. त्यानंतर त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात बोलवले तेव्हा ती महिला सासऱ्यासोबत पत्नीसारखे रहायचे म्हणत होती.अखेर काही प्रमाणपत्रे पाहिल्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या सासऱ्यासोबत सोडले.