मित्रांनो, एखाद्या नात्यामध्ये असताना मुली किंवा स्त्रीया खूप लवकर सिरीयस होतात पण पुरूष मात्र जबाबदारी घ्यायला घाबरतात. अशाने नाते जास्त दिवस टिकून राहत नाही त्यामुळे अशा अजून काही कारणांमुळेच स्त्रीया किंवा मुली त्यांच्या वयोगटाच्या पुरूषांसोबत नाते बनवण्यापेक्षा आपल्याहून वयाने मोठा असणारा पुरूष पसंत करत असतात.
या मोठया पुरुषांमधील या काही गोष्टी मुलींना खूप भावतात आणि त्यामुळेच त्या त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात कारण त्यामागे काही गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणून तर आधीच्या पिढ्यांमध्ये स्त्रिया व पुरुष यांच्यात किमान 4 ते 5 वर्षांचं अंतर होतं जे संसार फार काळ टिकतात.
एका संशोधनानुसार असे आढळले आहे की कित्येकदा मुलांच्या मनात रि’लेशनशिप विषयी गोंधळ निर्माण झालेला असतो.
या सर्वेनुसार पुरुषांना मात्र कमी वयाच्या मुली किंवा स्त्रियांबाबत आकर्षण वाटत असते. जसे माणुस आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलींकडे आकर्षित होतो, तसेच महिला पण त्याच पुरुषांना भाव देतात जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत.
दुसऱ्या एका संशोधनानुसार यामागील कारण म्हणजे असे पुरुष स्त्रीयांना समजूतदार वाटतात म्हणून त्याना आपल्यापेक्षा लहान पुरुषांसोबत योग्य वाटत नाही. तसेच प्रमुख कारण म्हणजे वयाने मोठे पुरुष आपल्या जीवनात आर्थिकदृष्ट्या स्थिर असतात. तसेच त्यांचे करीयर चांगले सुरु असते, त्याच्याकडे स्वतःचे घर असते.
अशा प्रकारे मोठ्या पुरुषांचे करिअर आधीपासूनच उत्तम असते. पुढील आयुष्याची फारशी चिंता त्यांना नसते. त्यांच्याकडे आपल्या पार्टनरला देण्यासाठी पूर्ण वेळ असतो. तसेच मोठे पुरुष आर्थिकदृष्ट्या सबळ असतात. मुली नेहमी भविष्याबद्दल चिंतित असतात. अशावेळी आयुष्यात पूर्वीपासूनच आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्या व्यक्तीशी आपलं लग्न व्हावे, असे मुलींना वाटत असते.
जास्त वयाचे पुरुष समजूतदार आणि अनुभवी असतात आणि म्हणून स्त्रिया त्यांच्याकडे पटकन आकर्षित होतात. त्याना स्त्रीयांच्या मनातील भावना लगेच समजतात यामुळे स्त्रिया किंवा मुली अशा मुलांना पसंत करतात. कमी वयाच्या मुलांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ते आपले परिवाराचे सं-गोपन करू शकतात.
वयाने मोठे पुरुष सर्व बाबतीत अनुभवी असतात आणि आपल्या पत्नीला जास्त सुखी ठेवू शकतात असे महिलांना वाटते. जर सामाजिकदृष्ट्या पुरुष वयाने मोठा असेल तर तो स्त्रीला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो तसेच तिचे हट्टही पुरवतो, म्हणूनच वयाने मोठ्या पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होत असतात. या काही गोष्टींमुळे आपल्यापेक्षा वयाने मोठा असणारा पुरुष महिलांना किंवा मुलींना जास्त प्रमाणात आवडतात. बऱ्याच मुली अशा पुरुषांशी विवाह करतात. नात्यात समजूतदारपणा येतो.