मित्रांनो, विदुरनीति बद्दल आपल्याला माहित असेलच. तर आज आम्ही तुम्हाला विदुरजींनी सांगितलेल्या असे काही महत्त्वाच्या गुणांबद्दल सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्याने ती व्यक्ती परिपूर्ण होऊ शकते आणि जगात त्याला मान-सन्मान मिळू शकतो. विदुरनीती मुळे लोक तुमचा नक्कीच आदर करतील. तसेच तुमच्या मताचा पण आदर करतील.
सर्वजण तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक पण करतील. तुम्ही बोलत असलेल्या प्रत्येक शब्दात इतकी ताकद येईल की, सर्वात खालची, क्रूर व्यक्ती जरी असले तरी देखील तुमचे शब्द आत्मसात करेल. विदुरजींनी आपल्या धोरणात मूर्ख, अहंकारी, अ’त्याचारी आणि क्रूर अश्या लोकांची वैशिष्ट्ये दिली आहेत. यासोबतच त्यांनी ज्ञानी माणसाची,
वैशिष्ट्ये काय आहे ते सांगितली आहेत. समा’जात वारंवार मूर्ख माणूस त्याच्या वागण्याने अपमानित होतो आणि त्याउलट शहाणा माणूस त्याच्या वागण्या- बोलण्यातून आणि बुद्धिमत्तेने जगात प्रसिद्धी मिळवतो. त्यामुळे आपल्याला जीवनात मान-सन्मान मिळवायचा असेल तर विदुरनीतीचे पालन केलेच पाहिजे. तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्नही कोणी करणार नाही आणि,
स्त्रिया सुद्धा तुम्हाला चांगला माणूस म्हणूनच ओळखतील. चला तर मग असे कोणते गुण आहेत ते जाणून घेऊया, ज्यांच्या आधारे माणूस स्वतःच्या जीवनाचे कल्याण सुद्धा करू शकतो. १) कपडे आणि राहणीमान :- सभ्य माणसा सारखे कपडे चांगल्या माणसाने घालावे, सभ्य व्यक्तीसारखे दिसण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, सै’तानासारखे कपडे त्याने घालू नये.
मुर्ख लोक आजकाल फॅशनच्या नावाखाली सैतान सारखे दिसण्यात मग्न आहेत, पण असे करून ते इतरांसाठी विनोदाचे पात्र बनतात. २) जास्त आग्रह करू नका :- इतरांपेक्षा जास्त आग्रह चांगल्या माणसाने धरू नये. तुमच्याशी वागायला किंवा बोलायला जर समोरची व्यक्ती तयार नसेल तर त्याला जास्त आग्रह करू नका. तुम्ही तुमची किंमत जास्त आग्रह केल्याने कमी करून घेत आहात.
३) स्वतःची जास्त स्तुती करू नका :- मूर्ख माणसाला स्वतः बद्दल फक्त ऐकायला आवडते. त्याला फक्त स्वतःचा गौरव करायचा आवडत असतो, पण परिपूर्ण माणसाने कधीच स्वतःचा गौरव करू नये. आपल्या तोंडाने नव्हे तर आपल्या कामातून त्याने मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःची स्तुती ऐकून सामान्य माणसाला आनंद होतो.
परंतु स्वतःचे अवगुण जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वोत्तम माणूस करतो आणि जेणेकरून तो स्वतःला सुधारू शकेल. ४) कोणाचेही ऐकणे :- जर एखादी व्यक्ती