आपल्यापैकी अनेक जण धावपळीचे जीवन जगत असतात. धावपळीच्या जीवन जगताना स्वतःला सिद्ध करत असतो. माझे माझे करत आयुष्य जगत असतो परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की, असलेले सत्य म्हणजे मृत्यू आहे. आपल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जायचं आहे. अचानक एखादा दिवस उजाडला आणि त्या दिवशी आपला मृत्यू होईल की प्रत्येकाला माहिती आहे परंतु नेमका हाच तो दिवस कधी उगवणार याबद्दल कुणाला काही माहिती नाही.
जो व्यक्ती जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे परंतु हे सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही. या सत्यापासून तो नेहमी पळत असतो. गरुड पुराणामध्ये असे काही संकेत सांगण्यात आलेले आहेत जे प्रत्येकाला मृत्युच्या आधी कळून चुकत म्हणजेच मृत्युचा आधी आपल्याला काही संकेत असतात परंतु अजाणतेपणे मुळे आपल्याला कळत नाही की आपला मृत्यू कधी होणार आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशा काही संकट विषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मृत्यूपूर्वी कळून चुकेल की येणाऱ्या तुमचा मृत्यू होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया असे नेमकी कोणते संकेत आहे जे आपल्या मृत्यूपूर्वी समजायला हवे..
शिव पुराणांमध्ये शिवशंभो महादेवांनी माता पार्वतीला उमा संहितेच्या आधारित काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये मनुष्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे मिळू शकतो याची नेमकी कोणती कारणे आहेत ज्यामुळे भविष्यात मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो. या शास्त्रामध्ये असे काही संकेत सांगण्यात आलेले आहे.या शास्त्राच्या आधारे आपण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी व किती दिवसांमध्ये होणार आहे त्याबद्दल चा अंदाज आपण मनामध्ये बांधू शकतो.
जर आपले शरीर पांढरे शुभ्र झाले आहे आणि शरीरावर लाल रंगाचे चट्टे निर्माण झाल्यास अशा वेळी समजावे की आपण फक्त सहा महिन्याचे पाहुणे सहा महिन्यानंतर आपला मृत्यू निश्चितच होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला ग्रहांचे दर्शन झाले परंतु दिशा मिळत नसेल तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा मृत्यू लवकरच येणार आहे येणार आहे सहा महिन्यांमध्ये त्याचा मृत्यू येऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीला निळा उडणाऱ्या माशांनी घेरलेले आहे असे जर घडले तर त्या व्यक्तीचा मृत्यू एका महिन्याच्या आत निश्चित आहे. शिव पुराणांमध्ये असे देखील सांगण्यात आलेले आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर ,घुबड झाड, कावळा अचानक येऊन बसला तर त्याचा मृत्यू एका महिन्यात होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीचे डोळे ,कान ,नाक, मेंदू व्यवस्थित कार्य करत नसेल त्या व्यक्तीचा मृत्यू भविष्यात सहा महिन्याच्या आत होतो असे देखील शिव पुराणांमध्ये सांगण्यात आलेले आहे.
ज्या व्यक्तीला सूर्य व चंद्र यांच्या आजूबाजूला असलेला परिसर काळा दिसत असेल किंवा या सूर्य व चंद्र यांच्या भोवती काळे वलय निर्माण होत आहे असे जर दिसू लागल्यास याचा अर्थ भविष्यात त्याची मृत्यू घटिका जवळ आलेली आहे असे देखील शिव पुराणांमध्ये सांगण्यात आलेले आहे. अशा प्रकारच्या व्यक्तीचा मृत्यू येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये होऊ शकतो असे देखील शिव पुराणांमध्ये वर्णन करण्यात आलेले आहे. जर एखाद्या व्यक्तीचे तोंड व गळा एकसारखा कोरडा पडत असेल तर अशा व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यांमध्ये होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.