हल्ली प्रत्येकाला त्वचेच्या संदर्भातील काही ना काही समस्या उद्भवत असतात. आपल्यापैकी अनेक जण त्वचेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असतात परंतु या समस्या भविष्यात आपल्या समोर एखादा गंभीर आजार म्हणून उभे राहतात. आपल्यापैकी अनेकांना थंडीच्या दिवसात बाराही महिने पायांना भेगा पडणे,पायाची त्वचा आग होणे, पायाचे तळवे वारंवार दुखणे, यासारख्या समस्या त्रास देत असतात.
ही समस्या आपण हलक्यात घेऊन याकडे दुर्लक्ष करतो त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक जण दिवसभर पायामध्ये बुट घालूनच प्रवास करत असतात किंवा अनेक जण पाण्याची स्वच्छता देखील करत नाही. या मंडळींना पायांच्या तळव्या संदर्भातील अनेक समस्या त्रास देतात. पायांच्या तळव्यांना वारंवार होणारी आग, पायांना भेगा येणे तसेच पायांना तडा जाणे ही समस्या सर्वसाधारणपणे महिलांना जास्त प्रमाणात सतावते.
अनेकदा महिला एका ठिकाणी उभे राहून घरातील कामे करत असतात. वारंवार होणारी धावपळ यामुळे सुद्धा आपल्या पायांकडे दुर्लक्ष होत असते. जर तुमच्या सुद्धा पायांना भेगा पडल्या असतील,पायाच्या तळव्यांना वारंवार त्रास होत असेल तर या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. या तेलाचा वापर केल्याने काही दिवसांमध्ये तुमच्या पायाची त्वचा मुलायम बनणार आहे व भेगा देखील नष्ट होणार आहेत, चला तर मग जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल..
अनेकदा आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.आपल्यापैकी अनेकजण पाणी जास्त पित नाही त्यामुळे आपल्या शरीरामधील पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो, अशा वेळी पायांना भेगा पडण्याची शक्यता असते व बहुतेक वेळा पायांच्या तळव्यांना जास्त प्रमाणामध्ये भेगा पडल्या मुळे अनेकदा र”क्त देखील बाहेर येते त्याच बरोबर काहींना वारंवार पायाला सूज निर्माण होते म्हणून अशा वेळी आपल्या पायांच्या भेगाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला खोबरेल तेल लागणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी खोबरेल तेल सहजरीत्या उपलब्ध होते. खोबरेल तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जी आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करतात. खोबरेल तेल नियमितपणे आपल्या पायांना हाताला लावल्याने आपली त्वचा मुलायम बनते तसेच त्वचा जर कडक झाली असेल तर कोमल बनण्यास मदत होते म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी अर्धा वाटी खोबरेल आवश्यकतेनुसार घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला बदामाचे तेल लागणार आहे. बदामाचे तेल आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज रित्या उपलब्ध होते.
बदामाचे तेल केसांना व हातापायांना लावल्यास आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त होतात. हे दोन्ही तेल आपल्याला एकजीव करून आपल्या पायाच्या तळव्याला लावायचे आहे. रात्री झोपताना आपण हा उपाय केला तर तुम्हाला सकाळी उठल्यावर फरक जाणवू लागेल. हे तेल लावल्या नंतर काही वेळ मालिश करायची आहे.
जेणेकरून तुमच्या तळ पायाच्या नसा मोकळ्या होतील व याच्यातील रक्तप्रवाह सुरळीत होईल त्याचबरोबर आपल्या पायाची त्वचा मुलायम बनवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर देखील करू शकता. कोरफड वापरल्याने तुमची त्वचा मऊ राहते आणि यामुळे भविष्यात कोणतीही समस्या देखील उद्भवत नाही म्हणून घरच्या घरी करता येणारा हा उपाय अवश्य करा आणि पायाला पडलेल्या भेगा लवकर दूर करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.