प्रत्येक जण आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. सौंदर्यामुळे व्यक्तीची व्यक्तिमत्व चांगले दिसते परंतु सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जणाला एक समस्या उद्भवत आहे. आपल्यापैकी अनेकांना तरुण वयामध्ये चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या येणे यासारख्या समस्या उद्भवतात आणि या समस्या मुळे कुठेतरी आपण आपले वाढलेले वय लपवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो त्याच बरोबर असे अनेक काहीजण सुद्धा आहेत की ज्यांचे वय कमी आहे.
परंतु चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण झालेले आहे त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असतील तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग, पिंपल्स, वांग निर्माण झालेले आहे ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे आणि तुमचा चेहरा अगदी चंद्रासारखा चमकू लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला पुदिनाचे पान लागणार आहे आतापर्यंत आपण पुदिनाचे अनेक औषधी गुणधर्म जाणून घेतलेले आहेत. पुदिना खाल्ल्याने आपल्या पोटाचे व पचन संस्थेच्या आरोग्य चांगले राहते पण त्याच बरोबर आपल्या चेहर्यासाठी सुद्धा पुदिना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो म्हणूनच आजच्या या उपायासाठी आपण पुदिनाचे पान वापरणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ पूदिनाचे पान घ्यायचे आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर खलबत्त्या च्या सहाय्याने बारीक पेस्ट बनवायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबू मध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, जे आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते व त्याचबरोबर लिंबू मध्ये ॲन्टी एजिंग व असे काही घटक असतात त्यामुळे आपल्या त्वचेवरील काळे डाग निघण्यासाठी मदत होते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ सुद्धा लागणार आहे. बेसन पीठ आपल्या सर्वांच्या घरांमध्ये सहज उपलब्ध होते.एक वाटी बेसन पीठ आपल्याला हा उपायासाठी घ्यायचा आहे त्यानंतर हे बेसन पीठ आपल्याला पुदिन्याची पेस्ट मध्ये मिक्स करायचे आहे व त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे त्या नंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे.
चेहऱ्याला लावल्यावर अर्धा ते एक तास मिश्रण असेच ठेवायचे आहे त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने चेहरा धुवू शकतो अशा पद्धतीने जर आपण आठवड्यातून एकदा हा उपाय केला तरी तुमची त्वचा पूर्णपणे चमकू लागेल. तुमच्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग निर्माण झालेले आहेत ते सुद्धा दूर होण्यास मदत होणार आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.