लग्नानंतर पती-पत्नीमधील नातं खूप महत्त्वपूर्ण असतं. एकमेकांसोबत प्रामाणिक राहिलं तर आयुष्य सुखकर होतं, असं म्हणतात. मात्र लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा पत्नीसमोग पतीचं असं एखाद गूढ समोर येतं, ज्याचा ती कधी विचारही करू शकत नाही, तर काय होईल? अशीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेने रिलेशनशीप कॉलममध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.
या दाम्पत्याला आहेत दोन मुलं : महिलेने सांगितलं की, तिचं लग्न 16 वर्षांपूर्वी झालं होतं. तिला दोन मुलंही आहेत. मात्र त्याच्या पतीने नुकतच तिच्यासमोर एक खुलासा केला आहे. महिलेच्या पतीने सांगितलं की, तो बाय से’ क्स’ लुर आहे. हे ऐकून महिलेला जबर धक्का बसला. तिच्या पतीने सांगितलं की, त्याला पुरुष आवडतात. महिलेने पुढे लिहिलं आहे की, ती कधी विचारही करू शकत नव्हती, की असं काही होऊ शकतं.
ती पुढे लिहिते की, ती समलैं’ गि’ क लोकांच्या विरोधात नाही. मात्र तिला स्वत:च्याच पतीबाबत अशी काही शक्यता वाटलीच नव्हती. महिलेच्या पतीने सांगितलं ती, तो पुरुषांना पाहून आकर्षित होतो. मात्र अद्यापही महिलेला संशय आहे की, त्याने सर्व गोष्टी सांगितलेल्या नाहीत. तो अजूनही तिच्यापासून काहीतरी लपवत आहे. यामुळे महिले खूप त्रस्त आहे. महिलेला शंका आहे की, तिच्या पतीचं दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर आहे.
तज्ज्ञांनी दिला हा सल्ला : एका तज्ज्ञाने महिलेला सल्ला दिला आहे की, सध्या पतीला तुमची सर्वात जास्त गरज आहे. अशी परिस्थितीचा सामना करणं सोपं नसतं. अशावेळी धाडसाने गोष्टी सांभाळा. तुम्ही पतीला विश्वासात घ्या व त्याच्या पाठीमागे उभे राहा. त्यांनी खरं मान्य केलं, याचं सर्वाधित कौतुक आहे.