मित्रांनो, परवा अश्विनी भेटली होती. दोघींचीही एकमेकांबद्दल विचारपुस झाली, खूप दिवसाने भेटल्याने तिने तिच मन माझ्या जवळ मोकळं केलं. कशी आहेस ? असं मी तिला विचारलं पण या प्रश्नातून इतकं काही बाहेर येईल असं मला कधीच वाटलं नव्हत. मला भेटली खूप आनंदी झाली कुठे असता मॅडम तुम्ही ? खूप दिवस झालं दिसलाच नाही. लग्न केलतं आम्हांला बोलावलं पण नाही.
असं लटक्या रागात तिने माझ्यावर असणारं प्रेम अजूनच दाखवून दिलं. मी म्हटलं, मी ठिक आहे. तू कशी आहेस हे सांग घरचे सर्व कसे आहेत ? आणि तुझा नवरा ? असं काही विचारल्यावर तिने चेहेर्याचा हावभाव बदलला. काय झालं हिला असा प्रश्न माझ्या मनात आला. ती आज व्यक्त झाली. मॅडम काय सांगू नवरा, नवरा कधी राहिलाच नाही ? दा’रु पिऊन घरात पडून राहतो.
मी दोन घरचे धूणीभांडी करते तेवढचं काय ? घरचे कुणी लक्ष देत नाही. सासू सासरे कोणीच लक्ष देत नाही. असं म्हणत तिच्या डोळ्यात पाणी आलं. अगं, अशी रडू नकोस, गप बस्स होईल सगळं ठीक काळजी करु नकोस. असं म्हणून मी तिला धीर दिला. पण ती थांबायला तयार नव्हती तिचे अश्रू असे डोळ्यातून पडू लागले जणू काही ते तिला म्हणत असावेत,
खूप दिवस आम्हांला अडवून ठेवलसं तू आता झालीस ना मोकळी. मी तिला समजावत होते पण ती खरचं आज मोकळी झाली होती. मला म्हणाली, मला काहीच सूचत नाही नवरा अशा अवस्थेत रोज असतो. जीव नकोसा झालाय मला. कधी कधी वाटतं कुठेतरी जाऊन जी’व द्यावा पण तो ही जाईल कि नाही माहित नाही मॅडम. अगं असं काय बोलतेस, होईल सगळं ठिक कशाला काळजी करतेस !
मी उत्तरले, कसलं ठिक होईल ? इथं वाट लागली माझी काही काही होत नाही. मनासारखं तर काहीच मिळत नाही. मी तिला अजूनच खोलवर विचारलं मनासारखं म्हणजे ? मॅडम कसं सांगू तुम्हांला? का गं काय झालं जे काही असेल ते बोल. मन हलकं होईल. मी तिला म्हटलं. माझा नवरा दिवस दिवस दा रु पितो. कधी त्याने मला कधीच जवळ घेतलं नाही कधी प्रेमाचे दोन शब्द बोलले नाहीत.
कधी फिरायला जाणे नाही. कधी काही तरी खावसं वाटलं तर तेही नाही. बाईला पुरुषाकडून जे हवयं ते हवचं आहे त्यात मी कमनशिबी आहे. मला कधीच नवर्याचं सुख नाही मिळालं नूसतं लग्न करुन आणलयं मला. गेली कित्येक वर्ष मी अशीच राहत्येय. काय करायचं असल्या नवर्याला.. जो फक्त समा’जाला दाखवण्यापुरता असतो. कसलं म्हणून सुखं नाही मुडद्या कडून मला.
मॅडम, ह्यो असला नवरा नशिबात पडलाय.. पदरी पडलयं पवित्र झालयं. अगं नको मनाला लावून घेऊस. असं मी म्हणताच ती ठामपणे म्हणाली, आता मी मनाला लावून नसते घेत मॅडम किती दिवस राहू मी असं मला पण मन आहे. माझं पण श-रीर आहे. जितकी प्रामाणिक राहिल तितकी दू’खावली जाईल मी. मी पण आता दूसरा पुरुष बघणार आहे. आता मात्र बुध्दी सुन्न झाली होती.
मी तिच्याकडे कटाक्ष टाकला पण तिने तो समजावून घेत मला सांगितले, माझ्याकडे आता पर्याय नाही मॅडम. माझा आनंद हा मी घेणार्या प्रत्येक गोष्टीत आहे आणि आता मला मी काय चूकीचं करते आणि किती बरोबर करते हे बघायची वेळ निघून गेलीय. म्हणून मी जशी आहे तशी खास आहे असं स्वतः हून मनाला समजावून सांगते. मी तिच्यावरची नजर हटवली पण मी शून्यात होते. विचारांच वलयाभोवती होते. इतक्या डिग्री पास होऊनही इतकं शहाणपण आलं नाही ते मला एका वस्तीपातळीवर राहणार्या बाईने दिलं होतं.
कदाचित! ती अनूभवातून ह्या पदव्या घेऊन इतक्या मोठ्या विचाराची झाली असेल. तिच्या या मताचं मी स्वागत केलं. कारण रोज मे’ल्याहून मे’ल्यासारखं आयुष्य जगण्यापेक्षा ती असं काही तरी करुन तिचं आयुष्य नव्याने खूलवत होती त्यात तिला आनंद होता. तिला समा’जाची भिती नव्हती. नाही कुणाची मिजासदारी, नाही कुठली शंका, नाही कुठला दबाव, नाही कुठली परंपरा.
होता तो फक्त आनंद आणि करण्याची हिंम्मत अशी हिंमत जी शिकलेल्या असंख्य पदव्या घेऊनही कुठलीच बाई या तत्वावर येऊन आपलं मत मांडणार नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.