मुलगी पाहायला आले आणि पुढे काय घडले.. नक्की बघाच ! एक सत्य घटना.. मुलीने मुलाला असे काही विचारले की सर्वजण शांत झाले..

जरा हटके

मित्रांनो, मुलगी वयात आली किंवा लग्नासाठी उपवर झाली की, तिच्या लग्नाची हुरहूर आई वडिलांना लागलेली असते. तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधणे हे त्यांच्यासाठी एक काळजी बनून राहते. आपल्या सुसंस्कृत मुलीसाठी चांगला मुलगा शोधणे प्रत्येक आई बापाचं एक कर्तव्य असते. असाच एक प्रसंग घडलेला आहे..

जो वाचून तुमच्या डोळ्यात पाणी भरल्याशिवाय राहणार नाही, मनाला अलगद स्पर्श करून जाईल. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा प्रसंग येतोच आणि प्रत्येक आई बापाला सुद्धा या प्रसंगातुन जावं लागतं, पण धीराने आणि संयमाने योग्य वर्तणूक आणि बोलणं हेही तितकंच महत्वाचे ठरत असते. आज तिची आणि तिच्या घरच्यांची गडबड सुरू होती, घरामध्ये अगदी तारांबळ उडाली होती.

ती, आई-वडील आणि तिची छोटी बहीण हाच तिचा परिवार पण गडबडीच कारणही तसंच होतं. तिला आज पाहायला मुलगा येणार होता आणि हे सगळं पहिल्यांदाच होतं. ती एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पदावर जॉब करत होती. छोटी बहीण देखील कमावती होती, सधन कुटुंबापैकी होती ती, आई वडील जुन्या वळणाचे. बऱ्याच दिवसांनी साडी नेसली होती तिनं,

हा साजशृंगार तिच्या सौंदर्यात भर टाकत होता. तिच्या बहिणीने बरेच फोटो काढले होते तिचे आणि सेल्फी देखील, व्हाट्सएपच्या डीपीची महिनाभर तरी काळजी नव्हती. आरशात स्वतःला निरखून थोडा विचार करत होती. तेवढ्यात आई आली – चल, मंडळी आली आहेत. तिथे गेल्यावर शांत रहा, काही कमी जास्त झाल्यावर आम्ही आहोतच. पाहुण्यांना उलट सुलट बोलू नकोस.

सर्व काही रिती रिवाजाने होईल, तू फक्त शांत बस अशी ताकीदच आईने तिला दिली होती. मनात आलेला संताप तिने मुकाट्याने आतच ठेवला, आणि आईसोबत बाहेर गेली. मुलगा दिसायला खूप छान होता, तिला पाहताच तो आवडला. तिथे बसल्यावर कानावर मोठ्या मंडळींचं बोलणं ऐकू आलं, लग्नाचा खर्च मुलीकडून होईल २५ तोळे सोने आणि संसाराला लागणाऱ्या वस्तू सर्व मुलींच्या कडून.

हे वाचा:   चालत्या ट्रेनमध्ये महिलेसोबत जे घडले, ते ऐकून उडेल माणुसकीवरचा विश्वास…

बाप रे, ती मनातल्या मनात हिशेब करत होती जवळपास २० लाखांना खर्च जात होता इतका खर्च तोही आम्ही एकट्याने ती मनात बोलू लागली व मध्येच मोठ्याने बोलली, मी काही बोलू का ? आईने कपाळावर आठ्या आणून नकारार्थी मान डोलावली. सर्वचजण मोठया आश्चर्याने तिच्याकडे बघू लागले. तेवढ्यात काका बोलले अजून लहान आहेस तू हे सर्व ठरवायला मग ती म्हणाली मग लग्न कशाला करताय माझे ? तिने मुलाकडे बघून विचारले मी काही विचारू ? मुलाने हसत मान डोलावली.

तिने प्रश्न सुरू केले, तुम्हाला पगार किती ? मुलाने उत्तर दिलं, यानंतर विचारलं की गावाकडे काही मालमत्ता ? त्याने उत्तर दिलं, आहे थोडी पण तिकडे काका असतात आम्ही जास्त नाही जात. पुढे विचारलं इथे फ्लॅट खरेदीचा विचार आहे की आधीच घेतलाय ? मुलाने सांगितले तेवढं सध्या बजेट नाहीये, पण नंतर घ्यायचा विचार आहे. त्याचा स्वर हळूहळू खाली जाऊ लागला पुढे विचारलं मागे पुढे कोण आहे ? तो बारीक आवाजात म्हणाला एक बहीण आणि भाऊ. आजूबाजूला कुजबुज सुरू झाली ही काय पद्धत आहे ?

सर्व काही रीतीने सुरूच आहे ना ? मुलाचे वडील बोलले. इतक्यात काका बोलले आम्ही आहोत हे सर्व बघायला पण तिने हात वर करून थांबवले. पुढं बोलत राहिली आता याचं प्रश्नांची उत्तरं मी देते. म्हणाली, तुझ्या पगारापेक्षा माझा पगार ५० % जास्त आहे शिवाय मला एक लहान कमावती बहीण देखील आहे. माझ्या वडिलांनी गावाकडे थोडी जमीन घेतलीय. इतकंच नव्हे तर याच विभागात 2BHK दोन वर्षांपूर्वी बुक करून ठेवलंय कदाचित या आठवड्यात चावी देखील भेटेल.

हे वाचा:   दिराचे झाले वहिनीवर प्रेम,नवऱ्याला समजल्यावर झाले असे काही…

इतकं सगळं असताना लग्नाचा खर्च आम्हीच का करायचा? रीतिरिवाज म्हणून की परंपरा म्हणून ? इथे बसलेले नातेवाईक आम्हाला कसली मदत करणार आहेत ? मुलगा हसला आणि म्हणाला मग काय उपाय आहे यावर तुझ्याकडे? ती म्हणाली मी तुला १ वर्ष देते एका वर्षात तू माझ्यापेक्षा जास्त कमावून दाखव आम्ही तुम्ही म्हणाल तस करू, सर्व रीतिरिवाज करू तसेच तू सगळं सोडून आमच्या नवीन घरी राहायला यायचं. सर्वत्र शांतता पसरली कुजबुज सुरू झाली, तेवढ्यात ती परत बोलली पूर्वीचे दिवस वेगळे होते.

लोक फक्त शेती करत होते. तसेच सोनं देखील खूप स्वस्त होतं. स्त्रिया शिकलेल्या देखील नव्हत्या. तेव्हा हे सगळं ठीक होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. मी कित्येक वर्ष एकच सोन्याची चेन घालतीये मला सोन्याची आवडही नाही मग मी २५ तोळे सोने का घालेन, काय गरज आहे त्याची ? आणि सांसारिक वस्तूच म्हणाल तर आम्ही आम्हाला जे आणि जसं लागेल तस घेऊ.

एवढं तर आम्ही करूच शकतो. इतकं सारं घडल्यावर पाहुण्यांनी निरोप घेतला. आई वडिलांनी दोन्ही मुलींना जवळ घेतलं, म्हणाले मुलगा नसल्याची खंत कधी वाटली नाही पण मुली असल्याचा खूप अभिमान वाटतोय. मित्रांनो तुम्हाला हि कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *