सध्याच्या काळामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एक समस्या मोठ्या प्रमाणावर सतावत आहे ती म्हणजे केसांची समस्या.सध्याच्या दिवसांमध्ये अकाली केसांचे पांढरेपण भरपूर प्रमाणामध्ये होताना दिसत आहे आणि ही समस्या दूर करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट म्हणजे उपचार सुद्धा करत असतात.
परंतु त्यामुळे फारसा आपल्या शरीरावर काही फायदा होत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय साधा सोपा व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व मानला गेलेला उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमचे केस कमी वयात पांढरे झाले असेल तर ते केस लवकरच काळे होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय अत्यंत साधा जरी असला तरी खूपच प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जे घटक वापरणार आहोत ते आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जातात. हा उपाय आपल्या शाम्पू मध्ये टाकून करायचा आहे. आठवड्यातून आपण दोन तीन वेळा तरी केला तरी तुमचे केस काळे होण्यासाठी मदत होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये कोणत्याही ब्रॅण्डचा शाम्पू घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चहा पावडर घ्यायची आहे.
चहा पावडर हे आपल्या आरोग्यासाठी तसेच केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण चहा प्रेमी आहे आणि चहा मध्ये चहापत्तीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या चहा पत्ती चा वापर करून आपण आपले केस चांगले ठेवणार आहोत. केसांना नैसर्गिक दृष्ट्या रंग प्राप्त होण्याचे कार्य चहापत्ती करत असते परंतु हा उपाय करण्यासाठी आपल्याला चहा पत्तीची पावडर करून घ्यायची आहे.
यासाठी आपल्याला एक ते दोन चमचा चहा पावडर आपल्याला येथे लागणार आहे. ही पावडर आपल्याला शाम्पू मध्ये मिक्स करायची आहे आणि काही वेळे तसेच ठेवायचे आहे त्यानंतर आपल्या तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे कोरफडचा गर. कोरफड आपल्या शरीरासाठी तसेच केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत करत असते. आपल्या केसांमध्ये व त्वचेमध्ये मेलेनिन नावाचे घटक असते.
हे घटक जर कमी असल्याने आपले केस लवकर पांढरे होतात व त्वचा सुद्धा पांढरी होते. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचा घटक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर. आवळा हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते व त्याचबरोबर आवळ्यामध्ये विटामिन सी असल्याने आपल्या शरीराला पोषक तत्व सुद्धा प्राप्त होत असतात.
जर आपण रात्री झोपताना आवळ्याची पावडर सेवन केली तर आपल्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होतात व त्याचबरोबर आपल्या केसांना नैसर्गिकरीत्या रंग देण्याचे कार्य सुद्धा आवळा पावडर करत असतो त्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचा आवळा पावडर घ्यायची आहे आणि मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे त्यानंतर आपल्याला खोबरेल तेल घ्यायचे आहे. एक चमचा खोबरेल तेल आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे.
खोबरे तेल हे आपल्या केसांना मजबूत बनवण्यासाठी वापरल्या केसांचे मूळ असते. केस घट्ट राहण्यासाठी मदत करत असते आणि त्याच बरोबर आपल्या केसांचे मॉइश्चरायझर व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा मदत करत असते.
आता हे सर्व पदार्थ आपल्याला एकत्रित एक जीव करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे, अशा प्रकारे आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केला तर आपले केस काळे होण्यास मदत होणार आहे व त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरलेले आहे ते नैसर्गिक दृष्ट्या उत्तम व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम तुमच्या केसांना होणार नाही म्हणूनच आपले केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.