वेळ कितीही वाईट असो आयुष्यात नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा.!

अध्यात्म

जीवनामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तिची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये असे काही वादळ निर्माण होत असतात ,संकटे येत असतात ,या संकटामध्ये जर आपले कोणी आपल्या सोबत असेल तर या संकटांचा आपल्याला फारसा काही त्रास होत नाही. या संकटांवर मात करू शकतो. जर आपल्या सुखामध्ये आपल्या जवळची व्यक्ती मंडळी आपल्या सोबत असतील तर सुखाची रंगत वाढत जाते आणि त्याचा आनंद चौपट होत असतो परंतु दुःखाच्या वेळी आपल्या व्यक्ती आपल्या सोबत असेल तर दुःखाची मात्रा कमी होऊन जाते आणि दुःख फारसे आपल्याला जाणवत नाही.

जेव्हा आपण एखाद्या अनोळखी जागेवर वास्तव्य करण्यास जातो ,आपले असे कोणीच नसते तेव्हा आपल्याला खूपच एकटेपणा जाणवत असतो. तिकडे घालवलेला प्रत्येक दिवस आपल्याला एका वर्षाप्रमाणे वाटू लागतो. असे आपल्याला जोपर्यंत वाटू लागेल तोपर्यंत आपण कोणाशी बोलत नाही. कोणाशी प्रेमाने वागत नाही, कोणाशी नातेसंबंध प्रस्थापित करत नाही.

जेव्हा आपण एकमेकांशी नातेसंबंध प्रस्थापित करत असतो तेव्हा एकमेकांशी संवाद साधताना आपल्या मनातील भावना सुद्धा आपण एकमेकांकडे व्यक्त करत असतो आणि अशानेच आपले नाते प्रस्थापित होत असते मग कालांतराने हे नाते घट्ट बनत जाते. अशा वेळी नेमकी जवळची व्यक्ती कोण असा सुद्धा आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो.तसे तर लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलो आहे अशी व्यक्ती, की काही काळ जीवनातील त्यांच्यासोबत व्यक्त केलेला आहे अशा व्यक्ती, सध्या आपण आपल्या सहकाऱ्यांसोबत कामासाठी घालवलेला क्षण म्हणजे जवळच्या व्यक्ती अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असतो.

हे वाचा:   गरुडपुराण: हे काम केल्याने मिळतो कुत्र्याचा जन्म; चुकूनही आयुष्यात हे काम करू नका.!

आपल्याला या प्रश्नांची उत्तरे शोधताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे जी व्यक्ती आपल्या दुःखामध्ये नेहमी सहभागी होते, आपल्यावर व दुःख आल्यावर नेहमी धावून येते तीच व्यक्ती अगदी जवळची असते. व्यक्तीची खरी ओळख काळानुसार बदलत असते आणि काळानुसार आपल्याला त्याची जाणीव होत असते. जेव्हा आपल्या दुःखावर कोणी फुंकर घालायला येते तेव्हाच आपल्याला त्या व्यक्ती ची खरी किंमत कळत असते.

आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात की ज्या नेहमी आपल्याला सांगत असतात की मी तुझ्यासोबत नेहमी राहील परंतु जेव्हा दुःखाची वेळ येते तेव्हा अशा प्रकारच्या व्यक्ती लगेच पळ काढतात परंतु सुखांमध्ये आपल्या सोबत नेहमी उपस्थित राहतात आणि जर आपल्या वर कोणत्याही प्रकारचेव दुःख आले तर ते लगेच पळ काढतात, अशा प्रकारची व्यक्ती कधीच आपले नसतात.

हे वाचा:   देवाची मूर्ती, फोटो फुटणे शुभ की अशुभ.? जाणून घ्या फुटलेल्या मूर्तीचे नेमके काय करावे याबद्दल....

जवळचे नसतात अशा व्यक्तींना नेहमी लांबच ठेवा कारण या व्यक्तींचा आपल्या जीवनामध्ये काहीच उपयोग नसतो. जर आपल्यावर सुद्धा वाईट वेळ आली असेल तर अशावेळी मध्ये आपल्याला धीराने सांभाळून घेणारी एखादी व्यक्ती तर हवी आणि म्हणूनच अशा क्षणी आपल्याला कळते की आपले कोण आहे परके कोण. कारण की दुखाच्या काळामध्ये कोण आपल्याला कशा पद्धतीची वागणूक देतो यावरून व्यक्तीची पारख होत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *