आचार्य चाणक्य यांच्या नितीशास्त्राचा भारतीयांच्या इतिहासात मोलाचा वाटा आहे. त्यांच्याकडे ज्ञानाचे अक्षरशः प्रचंड भांडार होते. त्यांच्या चाणक्य निती या महान गग्रंथामध्ये जीवनाला सुखमय बनवायचे काही उपाय दिले आहेत. ते उपाय प्रत्येकाला जीवनात कुठे ना कुठे कामी येतातच.
पैसा, जीवन, वा-सना आणि भोजन यातील मनुष्याची भूख कधीच मिटत नाहीत. हे त्याला कितीही प्रमाणात मिळाले तरी त्याची लालसा कमी होत नाही. जीवनात कधीही वाईट काळ येऊ शकतो त्यामुळे आपण पैसा सांभाळून ठेवला पाहिजे. खुप चांगले आणि सरळ राहुन जीवन जगू शकत नाही कारण त्याला हा समाज खुप त्रा स देतो.
म्हणून आपण एवढे साधेपणा पण दाखवू नका की लोक तुम्हाला सहजपणे फसवतील. घुबड दिवसा बघु शकत नाही यात सुर्य काय करणार? तसेच काही झाडांना फुले व फळे लागत नाहीत त्याला वसंत ऋतू काय करणार? म्हणून ही सगळी ईश्वराची कृपा आहे हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे, कारण ईश्वराचे सामर्थ्य इतके आहे की तो राजाचा दास आणि दासाचा राजा बनवू शकतो.
म्हणून चांगले लोक कुठेही गेले तरी ते आपले गुण सोडत नाहीत. पाप आणि पुण्य यामध्ये काय अंतर आहे म्हणजेच शत्रु कोण आहेत आणि मित्र कोण आहेत, कोणत्या निर्णयामुळे स्वतःचे नुकसान होणार आहे आणि कोणत्यामुळे फायदा याचा सर्व विचार करून माणसाला जीवनात पुढे गेले पाहिजे.
प्रत्येक वेळी सावधान राहणे गरजेचे आहे, कुणावरही विश्वास न ठेवणे हे गुण कावळ्या पासून शिकले पाहिजे, खुप भुकेलेले असताना देखील आहे त्या परिस्थितीत सुखी राहणे, गाढ झोपेतही सावधान राहणे हे गुण कुत्र्यापासुन माणसाला शिकले पाहिजे. असे भरपूर गुण प्राण्यांच्या पासुन आपल्याला शिकले पाहिजेत.
गरिबी जरी आली तरी बुद्धीमान लोक या गोष्टी कोणाला सांगत नाहीत. कारण त्यामुळे लोक आपल्यावर हसतात याची जाणीव त्यांना असते, आपले प्रत्येक काम आपण स्वतःच करायला हवे. भरपुर खर्च करणाऱ्या किंवा आपल्या कमाई पेक्ष्या जास्त प्रमाणात खर्च करणाऱ्या व्यक्ती कधी सुखी राहत नाहीत.
चांगल्या आणि सरळमार्गी काम कार्याने माणूस महान बनत असतो. जीवनात पैसा, धन, नाते या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. या जगात फक्त ध-र्मच आहे जो स्थायी आहे. त्यानेच माणूस महान बनू शकतो. कर्माने माणूस लहान-मोठा बनू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त कर्म करा.
त्यानेच जीवनात शांती येऊ शकते. माणसाच्या बाह्य रूपावर विश्वास ठेऊ नये जो बुद्धीमान व्यक्ती असतो तो समोरच्याचे आंतरिक गुण ओळखतो. मानवी जीवनात या शरीरात एक आ त्मा आहे पण या आ-त्म्याला बाजूला करून आपण कोणाला ओळखु शकत नाही.
केवळ आपल्या विचारांनी त्यांना ओळखू शकतो. वाईट माणूस आणि साप यांच्यात कोण चांगले आहे याचे उत्तर आहे की साप फक्त वाईट वेळेत समोरच्याला चावतो आणि वाईट माणूस प्रत्येक वेळी दुसऱ्याचे वाईट चिंतीत असतो. त्यामुळे वाईट माणसापासून सावध राहायला हवे. या गोष्टी सतत स्मरणात ठेवायला हव्यात तरच जीवन सहज जगता येईल.