अमेरिकेतील डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक महिला प्रवासी गर्दीतून कपडे न घालता फिरताना दिसली. तत्पूर्वी, जेव्हा पोलिसांनी या महिलेला पाहिले तेव्हा ती सहप्रवाशांशी बोलताना दिसली. विमानतळावर उपस्थित असलेल्या गर्दीत ती महिला लोकांना विचारत होती, ‘तुम्ही कसे आहात?’, ‘तुम्ही कुठून आहात?’ तेव्हाच पोलीस तेथे पोहचले आणि महिलेला चादरीने झाकण्याचा प्रयत्न करू लागले.
चादरीने झाकलेले असताना ती महिला हसत होती आणि पोलीस कर्मचाऱ्याने तिला झाकण्याचा प्रयत्न करत होते. ही घटना गेल्या महिन्यात घडली.एका व्हिडिओमध्ये महिला 19 सप्टेंबरला सकाळी 5 वाजता गेट ए -37 जवळ टर्मिनलवर चालताना दिसली. केसीएनसी/टीव्हीमधील एका अहवालानुसार, विमानतळ पोलिसांनी सांगितले की, त्यांना नशेत असलेल्या एका नग्न महिलेची माहिती मिळाली होती.
महिलेला रुग्णालयात पाठवले : पोलिसांनी सांगितले की, असे दिसून आले की महिलेची तब्येत ठीक नव्हती, त्यानंतर तिला रुग्णालयात पाठवण्यात आले. अहवालात पोलिसांनी म्हटले आहे की, दारूच्या नशेत असलेल्या महिलेबद्दल कळताच पोलिसांनी लगेच त्या महिलेचा शोध घेतला. अज्ञात वैद्यकीय कारणांमुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेबाबत अधिक तपशील उघड झालेला नाही.
महिला बिकिनी घालून विमानतळावर पोहोचली : तत्पूर्वी, मियामी विमानतळावर एक विचित्र दृश्य पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. एक महिला बिकिनी घातलेली आणि मास्क लावून विमानतळाच्या आवारात आल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. महिलेचा इन्स्टाग्राम व्हिडिओ ‘ह्यूमन्स ऑफ स्पिरिट एअरलाइन्स’ नावाच्या एका पेजने शेअर केला होता आणि व्हिडिओसह कॅप्शन असे लिहिले होते, ‘दुपारी पूल पार्टी करता आणि तुमची फ्लाइट 4 वाजता आहे.