लग्नाला ३ वर्ष होऊन गेले तरी मूल होत नव्हते.. शेवटी या स्त्रीने वैतागून उचलले हे पाऊल.. आज तिच्यासोबत…..

जरा हटके

सकाळी पूजा स्वयंपाक घरात आल्यावर मालती बाईंनी विचारले काय झाल टेस्ट चं ? त्यावर पूजा म्हणाली हो आई केली टे स्ट निगेटीव्ह आहे. यावर सासूबाई म्हणाल्या ते काय दरवेळी ठरलेलेच आहे, उगीच आस लावतेस आणि नाराज करतेस. त्यापेक्षा इथून जात का नाहीस म्हणजे आमची पीडा संपेल.

प्रसादवर एवढी कसली जादू केलीस काय माहीत. कितीतरी श्रीमंत घरातल्या सुंदर सुंदर मुली चालून येत होत्या पण त्याने आमचं ऐकलं नाही. हे सगळं बोलणं ऐकून पुजाला खुप वा ईट वाटत असे. पण हे सगळं वाईट बोलणे, टोमणे मा रणे तिच्यासाठी काही नवीन नव्हतं, गेली दोन वर्षे ती हे नेहमी ऐकतच होती.

खुप दवाखाने केले, वेगवेगळ्या डॉ क्टरांना दाखवलं, शेवटी बाबा, बुवांकडे ही उपाय केले पण काहीच फरक पडत नव्हता. मालतीबाई येता जाता टोमणे मारत होत्या त्यामुळे ती या सगळ्याला खुप वैतागली होती. पुजा आणि प्रसाद यांनी लव्ह मॅरेज केले होते, पण घरच्यांच्या संमतीने अगदी मुहूर्त बघून थाटामाटात लग्न झालं होतं. ते दोघे कॉलेज पासून एकत्र होते आणि ते नोकरी ही एकाच ठिकाणी करत होते. त्यामुळे दोघांनी घरी सांगून परवानगी घेऊनच लग्न केलं होतं.

तस बघितलं तर पुजा मालती बाईंना पहिल्यापासून आवडत नव्हती. पण बाकीच्या नातेवाईकांनी त्यांना समजावलं आणि प्रसादच्या हट्टापुढेही त्यांचं काही चाललं नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच मालतीबाई पुजाला पटवून घेत नव्हत्या, सतत तिचा राग करायच्या आणि प्रत्येक गोष्टीत चूक काढत होत्या हे येत नाही ते येत नाही, पण ती दुर्लक्ष करत होती. माधवराव पूजाला खुप सपोर्ट करत असे आणि प्रसाद ही तिला खुप आधार देत असे.

हे वाचा:   बायकोने खोलीत लावला कॅमेरा, नवरा करत होता खोलीत मस्ती,नंतर झाले असे…

पण आता आईच्या बोलण्याला तोही वैतागला होता. कारण रोज रोज आईच तेच सुरू होतं. त्याच्यासाठी पुजा नोकरी सोडून पूर्ण वेळ घराला देत होती. आईसाठीही खुप करत होती तरीही आई तिला पटवून घेत नव्हती. पण तो आईला काही बोलू शकत नव्हता. अलीकडे तर आईचा चिडचिडपणा खुपच वाढला होता. लग्नाला तीन वर्षे झाली तरी अजून मुल नव्हते, सगळे द वाखाने करून झाले होते पण काही उपयोग होत नव्हता.

घराण्याचा वंश कसा वाढणार यामुळे आज मालतीबाईंनी ठरवलेच होते की यातून काहीतरी मार्ग काढायचाच. संध्याकाळी सगळे जेवायला बसले होते. तेव्हा त्या मध्येच म्हणाल्या प्रसाद माझं आता वय झालं आहे पण डोळे मिटण्याअगोदर मला माझ्या नातवंडाना बघायचं आहे एवढीच इच्छा आहे तर माझं यात काय चुकलं? आपण सगळे द वाखाने सुद्धा केले पण तरीही काही उपयोग झाला नाही.

तू लग्न तुझ्या इच्छेने केले आम्ही काहीच बोललो नाही पण मला आता अस वाटतं की तू पुजाला घटस्फो ट द्यावा. निदान मला नातवंड बघायचं सुख तरी मिळेल. प्रसाद माधवराव सगळे शांतच झाले, पूजा रडत आत निघून गेली. कसतरी जेवण आवरून प्रसाद खोलीत गेला तेव्हा पुजा बेडवर अगदी शांत बसली होती. प्रसाद आत जाताच पुजा म्हणाली मला आईंचा निर्णय पटला आहे.

हे वाचा:   पतीने 2 वर्षापूर्वी केली होती न’सबं’दी तरी देखील पत्नी झाली ग’र्भवती.. जाणून घ्या त्याच्या पत्नीसोबत काय घडले होते..

त्यांचा निर्णय योग्य आहे, कोणालाही आपली नातवंड बघावं वाटणं हे साहजिक आहे आणि आपण त्यांना जर हे सुख देऊ शकत नसलो तरी त्यांच्याकडून हे सुख हिरावून घ्यायला नको. मी तुला घटस्फो ट द्यायला तयार आहे, आपण सगळ्या फॉर्मेलिटी करून घेऊ. वे ड लागलंय का तुला, काय बोलतेस तुला तरी कळतंय का? प्रसाद म्हणाला.

आपल्या दोघांमध्येही दो ष नाही. जर तुझ्यात दो ष आहे असं समजत असशील तर मग माझ्यात ही दो ष आहे. आपण यावर दुसरा काहीतरी मार्ग काढू, मी आईला समजावून सांगतो. आपल्या नशिबात असेल तर या घरात नक्की बाळ येईल पण त्यासाठी तू माझ्यासोबत असणं गरजेचं आहे अस म्हणत तो खोलीच्या बाहेर निघुन गेला.

दुसऱ्या दिवशी त्याने बालिका आश्रमातून फॉर्म आणला, सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण केल्या आणि अवघ्या तीन महिन्यांच्या सिद्धीला आपल्या घरी घेऊन आला. प्रसाद आणि पुजाच्या आयुष्यात सिद्धी आली. माधवरावांना त्यांचा हा हा निर्णय मान्य होता पण मालती बाई थोड्या नाराज होत्या. पण सिद्दीला आपल्या हातात घेताच त्या हे सर्व विसरून गेल्या व तिच्या बालपणात हरवून गेल्या.

त्यामुळे मालतीबाई पूजाला आता काही बोलत नाहीत आणि हा निर्णय मालतीबाईंनी स्वीकारल्याबद्दल पुजा ही आता खुप खुष होती कारण सिद्धीच्या येण्याने तिचीही मुलाची इच्छा पूर्ण झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *