जीवनातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे लग्न होय, ज्याबद्दल मुलगा किंवा मुलगी लहानपणापासूनच अनेक स्वप्न पाहत असतात. पण लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत आहे,तसे काही प्रश्न प्रत्येक मुलीच्या मनाला त्रास देऊ लागतात. हे प्रश्न काय आहेत तर घेऊया जाणून….
1) बहुतेक मुली विवाहापूर्वी स्वतःला हा प्रश्न विचारतात, ‘मी आता लग्न करण्याची घाई तर करत नाहीये’, ‘ मी माझ्या भावी जोडीदाराला समजून घेण्यासाठी जास्त वेळ घ्यायला पाहिजे होता का?’
2) लग्नाआधीच मुलीला तिच्या पतीच्या स्वभावाबद्दलही खूप चिंता असते. तिला नेहमी भीती वाटते की ती ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहे तो तिला समजून घेण्यास सक्षम असेल का नाही,आता बाहेरून जसा दिसतो तसा आतून स्वभावाने असेल का?
3) लग्नाआधी बऱ्याच मुलींच्या मनात अशी भीती असते की लग्नानंतर त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य तर संपणार नाही ना. लग्नाआधी ज्या प्रकारे खुलेआम निर्णय घेण्यास स्वातंत्र्य होते, लग्नानंतरही ते घेण्यास असेल की नाही, तिला तिच्या पतीचा किंवा सासू-सासऱ्याचा पाठिंबा मिळेल की नाही याची तिला नेहमी काळजी वाटत असते.
4) लग्नाआधी हा प्रश्न प्रत्येक मुलीच्या मनालाही त्रास देतो की जेव्हा ती तिच्या सासरच्या घरात पहिल्यांदा स्वयंपाकघरात काहीतरी बनवते तेव्हा तिच्या नवीन कुटुंबियांना आवडेल की नाही. कारण तिची पहिली छाप घरात चांगली असावी अशी तिची इच्छा असते.
5) लग्नाआधी मुलींच्या मनातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे ती लग्नानंतर आपल्या कुटुंबियांप्रमाणेच आपल्या सासरच्या लोकांशी सुसंवाद साधण्यास सक्षम असेल की नाही. तिच्या सासरच्यांनी तिला तिच्या कुटुंबाप्रमाणे प्रेम देतात का नाही, का त्यांच्याबरोबर बरीच जुळवाजुळव करावी लागेल.