आपली प्रत्येकाची जीवनशैली बदललेली आहे. कामाचे स्वरूप आणि बदललेले आहार या सगळ्यांमुळे प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार काम करत असतो. वेळेनुसार काम करत असताना या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होताना दिसतो. अशावेळी पचन पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य न करणे, पोटामध्ये गॅस जमा होणे, वारंवार पाद होणे, पोट फुगणे अशा विविध समस्या आपल्याला त्रास देत असतात.
या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो परंतु डॉक्टरांनी सांगितलेले उपाय काही काळापुरते असतात.आपले आयुर्वेदिक शास्त्र संपन्न असलेले शास्त्र आहे.या शास्त्रामध्ये आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगण्यात आलेले आहे. जर हे उपाय आपण व्यवस्थित मन लावून केले तर तुमच्या शरीराला खूप लाभ होऊ शकतो.
पोट मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर आपले पोट वेळेस साफ होत नसेल तर भविष्यात आपल्याला अनेक आजारांची लागण होऊ शकते आणि अशावेळी आपल्याला स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.ज्या व्यक्तींचे पोट नेहमी स्वच्छ असते अशा व्यक्तींना भविष्यात कोणते आजार होत नाही. आपल्या पोटाचे आरोग्य बिघडण्यास साठी वेगवेगळी कारणे सुद्धा असतात परंतु अनिद्रा वेळेवर न जेवणे, बाहेरील पदार्थ खाणे, मैदायुक्त पदार्थांचे सेवन करणे तसेच पोटाची स्वच्छता न ठेवणे या सगळ्या कारणांमुळे सुद्धा अनेकदा आपले पोट बिघडते.
ज्या व्यक्तीच्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट कमी झालेला असतो अशा व्यक्तींना सुद्धा पचन संस्था संदर्भातील वेगवेगळे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा आपण जे काही पदार्थ सेवन करत असतो त्या पदार्थांचे रुपांतर ऊर्जेमध्ये होत नाही आणि अशा वेळी ऊर्जेमध्ये रूपांतर न झालेल्या पदार्थांचे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे परिणाम पाहायला मिळतात.
हे पदार्थ पोटामध्ये सडून जाते आणि म्हणूनच आपल्याला पोट दुखणे, पोट भरल्यासारखे वाटणे,ऍसिडिटी अशा विविध समस्या आपल्याला त्रास देत असतात. आपल्या शरीरातील विविध समस्या दूर करण्यासाठी आपण लिंबू चा वापर करणार आहोत. लिंबूला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर लिंबू मध्ये विटामिन सी व अँटी अक्सिडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होतात.
लिंबूचे सेवन नियमितपणे केल्याने तुमचे पोट वेळेवर साफ होते तसेच आपण जे काही पदार्थ खातो त्या पदार्थाचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते.आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी काळीमिरी सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. काळीमिरी खाल्ल्याने आपल्या शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात तसेच यामध्ये पेपरीन नावाचे घटक असते, जे तुमचे शरीर आतून मजबूत बनवते.
आपल्या शरीराला आतून व बाहेरून मजबूत ठेवण्याचे कार्य सुंठ करत असते त्यामध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म असतात आणि म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला देखील लागणार आहे त्यानंतरचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे काळे मीठ. काळे मीठ यामध्ये ॲसिडिटी दूर करण्याचे व पित्त कमी करण्याचे अनेक औषधी गुणधर्म असतात.
आपले पोटाचे विकार दूर करण्यासाठी आपल्याला एक लिंबू मधोमध कापून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुंठ पावडर,काळे मीठ पावडर, काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि लिंबू व्यवस्थित झाकून आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे. लिंबू व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे आहे. आता हे लिंबू आपल्याला जेवण करण्याआधी चघळायचे आहे किंवा तुम्ही या लिंबू सरबत बनवून सुद्धा सेवन करू शकता असे केल्याने तुमच्या पोटाच्या सगळ्या समस्या लवकरच दूर होतील. ऍसिडिटी, अपचन यासारख्या समस्या भविष्यात होणार नाही व तुमचे पोट सुद्धा नेहमी साफ राहील.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.