ज्या महिलेच्या घरात या 3 वस्तू असतात , त्या घरात पैशाची कमी कधीच भासत नाही.!

अध्यात्म

हिंदू संस्कृतीत भगवंतांच्या पूजनाचे खूप महत्त्व आहे.भगवंतांचे पूजन करून आपले मन शांत होते. आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनाला सुख समाधान व शांतता मिळण्यासाठी भगवंतांचे पूजन केले जाते आणि त्यासाठी प्रत्येक हिंदूच्या घरात देवघरासाठी छोटीशी जागा राखून ठेवली जाते. एक देव्हारा आपल्या घरामध्ये स्थापन केला जातो.या देव्हाऱ्यामध्ये वेगवेगळे देव आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतात.आपल्या कुलस्वामिनी चे, कुलदैवत यांच्या मुर्त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपले देव्हारा आकर्षक व सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे प्रतीकचिन्ह आपल्याला पाहायला मिळतात.

आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये देवघर आपल्याला पाहायला मिळते परंतु देवघरामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू असायला हव्यात व कोणत्या वस्तू असायला हव्यात याबद्दल फारशी माहिती नसते. देवघरामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूचा आपल्या वास्तूवर व घरातील सदस्यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या माहितीच्या आधारे आपल्याला देवघरामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव पैसा ना देणार आहे तसेच आपल्या घरातील सदस्यांची नेहमी प्रगती होणार आहे याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत.

या काही वस्तू अतिशय पवित्र असल्याने आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये पूजा-अर्चना विधी करताना काही नियम सांगण्यात आले आहेत परंतु आपल्यापैकी अनेक जण योग्य नियमांचे पालन करत नाही म्हणूनच आपण कितीही देवपूजा केली तरी आपल्याला त्याचे फळ प्राप्त होत नाही. आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत जे नेहमी देवपूजा करत असतात परंतु त्यांना योग्य पूजेचे फळ काही प्राप्त होत नाही मग अशावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. भगवंताची पूजा अर्चना करत असताना आपण ज्या काही वस्तू वापरत असतो, त्या वस्तूंची काही नियमावली असते.

त्या वस्तूंची आपल्याला कशा पद्धतीने हाताळणी करायची आहे की आपल्याला माहिती असणे तितकेच गरजेचे आहे. जेव्हा घरी तुम्ही देवपूजा कराल तेव्हा सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करूनच देवपूजा करायची आहे. देव्हाऱ्याच्या आजूबाजूचा परिसर असतो नेहमी स्वच्छ ठेवायला हवा तसेच देवांची नेहमी स्वच्छता देखील घेणे गरजेचे आहे.आपल्या घरातील देव्हारा ईशान्य कोपऱ्यामध्ये असायला हवा. देवघराची मांडणी ही अतिशय साधी सुबक असली पाहिजे त्याचबरोबर देवघरामध्ये कधीही देवी देवतांच्या मूर्त्या स्थापन करायला पाहिजे. आपले गुरु यांच्या मुर्त्या व फोटो कधीही लावू नये.

हे वाचा:   रविवारी रात्री झोपताना उष्टे पाणी गुपचूप इथे फेका; पैशांच्या राशी लागतील, होतील सगळ्या अडचणी दूर.!

नेहमी देवांना नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवणार असाल तर तो स्वतः चव घेऊन देखील पाहू नका. देवघरामध्ये देवी-देवता यांच्या मुर्त्या कधीही उभ्या असलेल्या स्वरूपामध्ये ठेवू नये, नेहमी बसलेल्या शांत मुद्रामध्ये असायला हवे. तुमचे देवघर चुकूनही बेडरूम मध्ये मांडू नका,असे केल्याने तुम्हाला हळूहळू गरिबी व कंगाली येऊ लागते. तुमचे घर लहान असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये देवघर मांडू शकता परंतु रात्री झोपताना आपल्याला एक लाल रंगाचा पडदा लावायचा आहे.

आपल्यापैकी अनेकजण देवाला वाहिलेले ,सुकलेली फुले ,अगरबत्ती कापूर यांचा जो निर्माल्य असतो तो एका बाजूला मांडून ठेवतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर विसर्जन करतात असे जर तुम्ही सुद्धा करत असाल तर ते अत्यंत चुकीचे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व ज्या घरांमध्ये नकारात्मकता असते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी कदापि वास्तव्य करत नाही ,चला तर मग आता आपण अशा काही तीन गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत जे प्रत्येकाच्या घरामध्ये असणे गरजेचेआहे.

पहिली वस्तू म्हणजे गंगाजल. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गंगाजला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे.गंगाजलाचा उपयोग अनेक शुभकार्य पूजाविधी मध्ये प्रामुख्याने केले जातात.आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी गंगाजल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. यातील दुसरे सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे शंख. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शंख प्रामुख्याने पाहायला मिळतो. शंख चे वेगवेगळे प्रकार देखील असतात. काही दक्षिण मुखी असतात तर काही साधे शंख असतात.

हे वाचा:   हे ना पाप आहे ना पुण्य, हे तुमच्यासाठी श्रा’प आहे, या राशींनी 48 तास सांभाळून राहा.!

देवपूजा करत असताना प्रत्येकाने शंखनाद अवश्य करायला हवा. शंख हेच श्रीविष्णू यांचे प्रतीक मानले जाते आणि ज्या घरामध्ये शंखनाद केला जातो,अशा घरांमध्ये नेहमी विष्णू देवमाता महालक्ष्मी सदैव वास्तव्य करते शंखनाद यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते ती या ध्वनी मुळे निघून जाते आणि घरामध्ये सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू लागते म्हणून अशावेळी जर तुमच्या काही शंख असेल तर शंखाची नेहमी पूजा-अर्चना करायला हवी व शंख हा कधीही रिकामी ठेवू नयेत या मध्ये नेहमी पाणी भरलेले असायला हवे त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलश.

आपला हिंदू धर्मशास्त्रामध्ये कलश पूजेला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहेत. कोणतेही कार्य पार पाडताना आपण कलशाची पूजा करत असतो. कलश म्हणजे माता महालक्ष्मी यांचे प्रतीक मानले गेले आहे,ज्या घरामध्ये नेहमी गणेशाची पूजा केली जाते तिथे सुख शांती वैभव कायमस्वरूपी वास्तव्य करत असते. कलश हा नेहमी देवघराच्या उजव्या बाजूला प्रस्थापित करायला हवा ते पूजा केल्यानंतर कलशातील गंगाजल घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडायला हवे यामुळे घरातील वाईट शक्‍ती नष्ट होऊन जाईल. हे तुमच्या घरा मध्ये नेहमीच सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुमच्या घरातील सदस्यांना सुख-शांती लाभेल कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास असेल तर तो निघून जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *