कानपूरः यूपीच्या कानपूरमध्ये एका नवीन वधूची धक्कादायक घटना उघडकीस आली असून त्यामुळे संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. हनीमूनवर वधूने असे काही केले की तिचा नवऱ्याचे होश उडाले. हनिमूनच्या वेळेस वधूने त्याच्या दुधात झोपेची गोळी मिसळून दिली. दूध पिल्यावर नवरा झोपी गेला. जेव्हा तो जागा झाला तेव्हा खोलीत ठेवलेल्या वस्तू विखुरल्या होत्या.
25 हजारांची रोकड व सुमारे तीन लाखांचे दागिने घेऊन नवविवाहिता फरार झाली होती. धीरजसिंग उर्फ नवाब, रासुलाबाद पोलिस स्टेशन परिसरात खेम निवाडा गावात राहतो .तो वडिलांसोबत शेतीकाम करतो. धीरजसिंगचे लग्न बस्तीच्या मुंडरवा तहसीलच्या एका गावात शेतकऱ्याच्या मुलीबरोबर झाले होते. धीरज सिंग 25 जूनबरोजी मिरवणूक घेऊन वधूच्या घरी गेला होता आणि 27 जूनला वधूला घेऊन परत घरी आला होता.
हनीमूनच्याच दिवशी नवविवाहिता रोख व दागिने घेऊन पळून गेली. अर्धे दागिने मोठ्या बहिणीचे होते पहाटे चारच्या सुमारास नवऱ्याने डोळे उ घडले तेव्हा खोलीतील सामान विखुरलेले दिसले. कपाट खुले होते आणि त्याची पत्नी देखील दिसत नव्हती. धीरजने बाहेर येऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांना पत्नीबद्दल विचारला असता त्यांनीही धिरजच्या पत्नीची माहिती नव्हती.
जेव्हा नातेवाईकांनी कपाट तपासला तेव्हा दागिने आणि रोकड त्यातून गायब झालेली दिसली. कपाटात ठेवलेले अर्धे दागिने मोठ्या बहीणेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन भिन्न क्रमांकावरून कॉल आला धीरज आणि त्याच्या कुटुंबीयांनी नवविवाहित महिलेचा शोध सुरू केला. नवविवाहितेचा फोनही बंद होता. धीरजने पत्नीच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांनीही काही माहिती नव्हते.
धीरज सांगतात की मंगळवारी रात्री वेगवेगळ्या नंबरवरून दोन कॉल आले. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वत: ला बायकोचा मामा म्हणून ओळख करून दिली आणि दीर्घ संभाषण केले होते. यानंतर बायकोने दूध आणले, ते पिल्यानंतर पती झोपला. पीडितेच्या कुटूंबाने नवविवाहित मुलीचा शोध सुरू ठेवला, परंतु ति काहीही सापडली नाही. पीडितेच्या कुटूंबाने रसूलबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रसूलबाद पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रमोद शुक्ला यांचे म्हणणे आहे की,नोंद केलेल्या घटनेच्या आधारे तपास केला जात आहे.