साधनाने गौरी च्या खोलीचे दार उघडून आत पाऊल टाकले. एक प्रकारची उदासी नीरव शांतता त्याच्या मनाला भेटली.गौरीला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते. साधनाने तिचे कपड्याचे कपाट उघडले त्याबरोबर गौरी बद्दल च्या आठवणीत तिच्या मनात दाटून आल्या तिने तिच्या अश्रूंना वाट करून दिली.गौरी गेल्यापासून प्रश्न सारखा सतावत होता ..अवघ्या सतरा वर्षांची माझी लेक असे काय झाले की तिला स्वतःला संपवून घ्यावेसे वाटले असेल.
व्यवस्थित आवरलेल्या कपाटातील कपडे शून्य नजरेने पहात तिने कपडे चा खालचा ड्रॉवर उघडला त्यात गौरीची डायरी साधनाच्या दृष्टीस पडली तर ती डायरी उचलून तिने त्याची पानं चाळली तारखेनुसार काही नोंदी करून ठेवल्या होत्या जवळच्या खुर्चीत बसून साधना डायरी वाचू लागली. दिनांक 30 /3/2018. आज खूप कंटाळा आलाय. मूड होत नाहीये. आज आईला उशीर होणार असे दिसते तरी ती काय करणार जास्त काम असणार त्यामुळे उशीर होणारच असते तर आईला एवढं काम करावं लागलं असतं..
घरातली कामे ऑफिसच्या वेळा सांभाळणं दिवस मावळतो एकच स्वप्न आहे तेच मी शिकून खूप मोठं व्हावं आणि तिचे स्वप्न मी नक्की पूर्ण करणार. चला थोडा वेळ फेसबुक वर जाते म्हणजे वेळ तरी जाईल. दिनांक 031/3/2018 काल फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली खरं तर मी त्याला ओळखत नाही.आईने सांगितले अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करायचे नाही पण कसला भारी दिसतो ना तो त्याच्या प्रोफाइल फोटो मध्ये मी त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली .दिनांक एक 1/4/2018 ला मी फेसबुक मेसेंजर चॅट केले त्याच्याशी बोलून मला खूप इंटरेस्टींग वाटलं त्याच्यासोबत पुढे बोलू लागली.
त्याचे नाव साहिल होते. दिनांक 2/4/ 2018 मी आणि साहिल आज एकमेकाचे चे नंबर घेतले त्याने लगेच मला कॉल केला.. काय मस्त बोलतो ,बॉलीवूड हिरो सारखा वाटतो. हे सगळं आईला अजिबात आवडणार नाही पण मी कधी तरी त्याच्याशी बोलत आहे,सारखं सारखं नाही… दिनांक 4/4/2018 अभ्यास केला. मोबाईल ला दिवस भर हात लावला नाही पण क्लासेस कधी सुरू झाले आणि गेल्यापासून खूप अभ्यास करायचा आहे. साहिल मला फेसबुक वर ऑनलाईन असतो, त्याच्याशी गप्पा मारताना खूप वेळ जातो आणि फक्त फेसबुक वर ऑनलाईन आहे.काल फेसबुक वर गेले तर साहिल ऑनलाइन दिसला आता पाच-दहा मिनिटं चॅट करणार होते तास-दीड तास कसा गेला कळलेच नाही. आता अर्ध्या तासापूर्वी त्याचा व्हिडिओ कॉल आला होता.
प्रोफाईलवर दिसतो त्यापेक्षा वयाने मोठा वीस एकवीस वर्षाचा पण कसला हंड्सम दिसतो आणि बोलतोपण मस्त असे वाटते त्याच्याशी बोलत रहावे. मग रविवारी जे एम रोडवरच्या सीसीडी मध्ये भेटायचे म्हणतोय जावं का ? त्याला भेटायची खूप इच्छा आहे दिनांक 8/ 4/ 2018 आज भेटलो.खूप गप्पा झाल्यावर त्याचे आई-बाबा नगरला असतात हे कळले, मित्रांसोबत फ्लॅट शेअर करून राहतो.
इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला आहे. बोलता बोलता त्याने त्याचा हातात माझा हात घेतला आणि माझ्या सर्व अंग भागात वीज चमकून गेली. आज-काल डायरी लिहायला सुद्धा वेळ मिळत नाही.अभ्यासात मन लागत नाही. या आठवड्यात मी कुठलीही विकली क्लास टेस्ट दिली नाही. बस साहिल अन् साहिल आणि फक्त साहिल त्याच्याशीच फोन कॉल ,व्हिडिओ कॉल आणि त्याचे विचार दुसरं काही सुचतच नाही.आम्ही दोनदा भेटलो.उद्या त्याच्या फ्लॅटवर भेटायचे ठरले. दिनांक 16/4/2018 त्याला भेटायला फ्लॅट वर गेलो तिकडे आम्ही दोघेच होतो तिथे त्यांनी मला मिठीत घेऊन कपाळावर चुंबन केले नंतर मला उचलून बेडवर ठेवले त्याच्या प्रेमात इतके व्यस्त होते की एकमेकांचे कपडे कधी दूर झाले कळलेच नाही..
हो दिनांक 30 4 2018 आज काल आम्ही साहिलच्या फ्लॅटवर भेटतो ते आठवड्यातून दोन तीनदा..राहवतच नाही एकमेकांशिवाय..सेक्स झाल्यावर दोघांच्या सेल्फी व्हिडिओ काढला करताना अवघड वाटल्याने मी नको म्हणत होते. तरीही त्याने ऐकले नाही. सरांचा आईला एसेमेस आला होता. आई म्हणाली तू मोठी झालेली आहेस परीक्षेला का नाही गेलीस ? याच्यावर माझ्याकडे काही उत्तर नव्हते ..आज काल तुला माझ्याशी बोलायलाही वेळ नसतो.. ग टेन्शन आहे का? मी काहीतरी सांगून वेळ निभावून नेली. दिनांक 25/ 4/ 2018 रोजी हा कसा वागू शकतो माझ्या सोबत?
त्यांनी मला फसवले आहे. हे सगळे पाहून मला रडू होते. असा कसा आहे समजू शकतो जर राहुल ला नाही म्हटले तर त्याने सांगितले की तुझा सेल्फी व्हिडिओ माझ्याकडे आहे अन्यथा मी पोर्न साइटवर टाकेल तेव्हा मला स्वतःची लाज वाटू लागली आणि देवा मी कुठे अडकले त्यातून कसे बाहेर पडू. आईला सांगितले तर आई माझ्यावर भडकेल,ती रागवेल. गौरीने आपल्या शरीराची चाळण केली आहे असे जाणवत होते कारण की साहिल व त्याचे मित्र तिच्याकडे नको त्या गोष्टी करून घेत अस. वेगळे वेगळे पोर्न दाखवून तिच्या कडून सेक्स करून घेत असे आणि मी विरोध केला तर तिच्या सोबत काढलेला व्हिडिओ व्हायरल करतिल असे सुद्धा म्हणून धमकी देत होते आणि या त्रासाला कंटाळून तिने एक दिवस आ’त्मह’त्या केली..
अशाच एके दिवशी साधना ला सगळ्या गोष्टी आठवल्या. तिने लिहिलेल्या गोष्टी सगळ्या वाचल्या आणि मोबाईल फोन मधील मेसेज सुद्धा पाहीले आणि अचानक तिला आठवले की तिच्या मैत्रिणीचा नवरा सायबर सेलमध्ये आहे अशा वेळी तिने चित्रा नावाच्या मैत्रिणीला फोन केला आणि तिचा नवरा विजय याच्याशी भेट घेण्याची विचारले भेट ठरली.. साधनाने आपल्या मुलीची डायरी आणि मोबाईल फोन दिला आणि विजयने सुद्धा काही दिवसातच या ठिकाणावरून मेसेज केले होते ते ठिकाणात आयपी ऍड्रेस वर ठिकाण शोधले आणि त्या तिघांना पोलीस गजाआड केले परंतु गौरीच्या अचानक जाण्याने साधनाला खूप धक्का बसलेला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.