मित्रांनो मानवाला सुंदर दिसण्याचे भारी आकर्षण असते. त्याला शरीराचे सर्व अवयव नीट नेटके असावेत असे वाटते. केसांचे तर त्याला अगदी प्राचीन काळापासूनच आकर्षण आहे व आज काल केस वाढवण्यासाठी सर्वचजण खूप प्रयत्न करतात. काही लोकांचे केस अतिशय सुंदर, दाट असतात पण छोटे असतात पण काही जणांचे काळेभोर, लांब असतात पण खूपच पातळ असतात, काहींचे केस खूप लवकर पांढरे होतात, केसगळती, केसातील कोंडा अशा बऱ्याच समस्या सध्या सुरू आहेत.
ज्याचं कारण प्रदूषण, खाण्याच्या सवयी आहेत. केस हे माणसाला अत्यंत सुंदर बनवतात त्यामुळे आपल्या या केसांचे आरोग्य हे खूप महत्वाचे असते, केस दाट, काळेभोर, लांबसडक असावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आताच्या बदलत्या जीवनशैली मध्ये या केसांचे आरोग्य चांगले राखणे खूप गरजेचे ठरते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुमचे पातळ आणि पांढरे केस घन-दाट व काळेभोर बनतील हा उपाय खूपच सोपा आहे आणि या मध्ये तुम्हाला जास्त खर्च देखील करण्याची आवश्यकता नाही आहे. हा रामबाण उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो सुंदर दिसणे सर्वांना आवडते. सुंदर चेहरा सगळ्यांनाच हवा-हवासा वाटतो. केस हे मानवाचे सगळ्यात मोठे आकर्षण असते. मात्र जर तुमचे केस पांढरे किंवा पातळ, खूप मोठ्या प्रमाणात केसगळती असेल तर तुम्ही हे काही उपाय केल्यास तुमच्या केसां संदर्भात सर्व समस्या दूर होतील. हा उपाय केल्याने तुमच्या केसांना काळे, लांब आणि खूप घनदाट बनवू शकतात.
यासाठी सर्वप्रथम नारळाचे तेल जे शुद्ध असेल, होय नारळाच्या तेला मध्ये अनेक पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी अनुकूल असतातच परंतू आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील हे चांगलेच फायदेशीर असते. या नंतरचा घटक जो आपल्याला लागेल तो म्हणजे विटामीन इ च्या गोळ्या लागतील ज्या हिरव्या रंगाच्या असतात आणि या तुम्हाला कोणत्याही नजीकच्या मेडिकलमध्ये 20 ते 22 रुपये मध्ये मिळतात. विटामीन इ मध्ये अनेक जीवनसत्व असतात ज्याच्या वापराने तुमचा चेहरा उजळू लागतो तसेच जर याचा वापर आपण आपल्या केसांवर केला तर तुमचे केस काळभोर व चमकदार बनतील.
हा उपाय करताना आपल्याला पुढिल क्रम वापरायचे आहेत. नारळाचे तेल व विटमीन इ च्या गोळ्या यांचे हे मिश्रण करण्यासाठी आपल्याला 3 चमचे नारळाचे तेल एका छोट्या वाटीत घ्या कारण नारळाच्या तेलामुळे आपले केस काळे होण्यास आणि दाट होण्यास मदत होते. या नंतर व्हिटॅमिन इ ची गोळी घेऊन गोळीतले जे लिक्विड द्रव पदार्थ असतो ते त्या मिश्रणात मिक्स करून घ्या.
विटामीन इ च्या गोळ्यांमुळे आपल्या केसांची वाढ तर होतेच मात्र ते काळे व मजबूत बनतात. पण इथे या उपायासाठी आपल्याला त्यातील लिक्विड वापरायचे आहे आणि हे मिश्रण 10 ते 20 मिनिटे चांगले ढवळुन एकजीव करून घ्यावे आणि नंतर हाताने केसांच्या मुळांना हे मिश्रण हळुवार लावा, हळुवार मसाज करा कमीतकमी 5 मिनिटे तरी मसाज करावा.
अर्धा तास मेस तसेच सुखवा, अर्ध्या तासाने कोणत्याही हर्बल शांपूने हे केस स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यात 2 वेळा करा आणि केसांना नेहमी नारळाचे तेलच लावावे. यानंतर तुमचे केस काळे, घनदाट व लांब होतील आणि तुमचे सौंदर्य पुन्हा चमकेल. हा उपाय करताना तुम्ही एक काळजी घ्या, की या उपायादरम्यान आठवड्यात किमान तीन दिवस तुमच्या केसांना कोणत्याही प्रकारचा शॅम्पू लावू नका. कारण त्यामुळे केसांवर केलेला हा उपाय निष्फळ ठरतो. असा हा नैसर्गिक साधा सोपा उपाय करुन तुम्ही तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी बनवू शकता. कृत्रिम रसायने न वापरता आम्ही सांगितलेला हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच करुन पहा.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.