बदलत्या जीवनात माणूस इतका व्यस्त झाला आहे की त्याला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ नाही, त्यामुळे तो विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत आहे. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी अशा अनेक समस्या त्याच्या जीवनात निर्माण झाल्या आहेत. तसेच या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आ यु र्वे दा त सांगितले आहेत.
त्याने या सर्व प्रकारच्या समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होते. तसेच गुडघेदुखीची स-मस्या जरी साधारण वाटत असली तरी अतिशय वेदनादायक असते असे बरेच अनुभव आपल्याला मिळत असतात. गुडघेदुखी ही वयोवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. केवळ वयोवृद्धच नाही तर तरुण वर्ग व लहान मुलांमध्ये देखील गुडघेदुखीची स-मस्या दिसत असते.
अशाच प्रकारे कंबरदुखी, सांधेदुखी देखील आहे म्हणून यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी या समस्या आपल्या शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. या उपायाने आपल्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाणही योग्य राहण्यास मदत होते.
यासाठी आपल्याला प्रथम खारीक लागणार आहे. खारीक ही उर्जावर्धक आणि शक्ती वाढवण्यासाठी खुप महत्त्वाची मानली जाते. यामध्ये पौष्टीकता खुप असते आणि ही खारीक आपण दुधाबरोबर घेतली तर 4 पटीने तिचे गुणधर्म वाढतात. फुफूसाचे सर्व विकार दुर करण्यास मदत करते. या 2 खारिक आपण बारीक करून घ्यायच्या आहेत. तसेच शारीरिक दुर्बलता दुर करून शक्ती वाढवण्याचे काम ही खारीक करते.
ही खारीक बारीक करून दुधात मिक्स करून ते दूध उकळून घ्यायचे आहे. त्याने त्या खारकेचे गुणधर्म त्या दुधात उतरण्यास मदत होते. या दुधात 2 चमचे पावडर घालायची आहे. हे मिश्रण झालेले दूध आपल्याला संध्याकाळी झोपताना घ्यायचे आहे असे केल्याने तुम्हाला कायमस्वरूपी या सर्व समस्येवर मात करण्यासाठी मदत होईल.
पण हा उपाय करण्यापूर्वी 1 तास आधी आणि दूध पिल्यावर 1 तास नंतर काही खाऊ नये. तसेच यामुळे तुमचा सर्दी आणि खोकला ही नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. याने वजन वाढते तसेच तुमच्या शरीरावरील त्वचा चमकदार होण्यास सुरुवात होते.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा