आपल्या आजूबाजूला असे अनेकजण आहेत की ते भरपूर प्रमाणात खातात परंतु खूप सारे पदार्थ खाऊन सुद्धा त्यांची शरीरयष्टी अत्यंत पातळ असते. त्यांचे वजन वाढत नाही. अनेकदा अशा प्रकारच्या व्यक्ती जास्त जेवत नाही कारण की कमी खाल्ल्यामुळे त्यांचे पोट भरून जाते व त्याचबरोबर काही जणांची पचन संस्था सुद्धा कार्य चांगली करत नाही आणि म्हणून अनेकदा पदार्थ खाल्ले सुद्धा त्यांची भूक लवकर भरून जाते.
वजन वाढवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे जास्त कार्बोहायड्रेटस पदार्थ, चांगली जीवनशैली आणि चांगल्या प्रतीचा पद्धतीचा वर्कआउट. आपल्यापैकी अनेक जणांचा गैरसमज असतो की खूप सारे पदार्थ खाल्ल्याने आणि जंक फूड खाल्ल्याने वजन वाढते परंतु यामुळे वजन वाढत नाही तर तुमच्या शरीरावरिल चरबी अति प्रमाणामध्ये वाढते.
अनेकदा शरिरावर चरबी वाढल्याने आपल्या शरीराचा आकार सुद्धा वाढतो व त्याचबरोबर जेव्हा आपण काही पदार्थ खातो यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्व सुद्धा मिळत नाही आणि म्हणूनच पोट व यकृत तसेच त्वचा संबंधित विविध आजार सुद्धा आपल्याला उद्भवू लागतात. ज्या पद्धतीने शरीरावर अतिरिक्त चरबी असल्यावर आपल्याला समस्या उद्भवत असतात त्याच बरोबर शरीर पातळ असल्यावर सुद्धा अनेक आजार होण्याची शक्यता असते यामुळे हाडे यांची कमतरता, पोषणतत्वांची कमतरता, पोटा संबंधित समस्या , नेहमी अशक्तपणा वाटणे, शरीरामध्ये ऊर्जा नसणे अशा अनेक समस्या आपल्याला उद्धवू लागतात.
आपल्या आजूबाजूला असे काही पदार्थ आहेत की जे कमी प्रमाणामध्ये खाल्ल्यावर सुद्धा आपल्या शरीराला योग्य ते पोषकतत्व मिळत असतात आणि म्हणूनच काही दिवसांमध्येच आपले शरीर मजबूत बनते व आपले वजन सुद्धा चांगले बनेल. चला तर मग आपण जाणून घेऊया आजच्या लेखामध्ये असे कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे आपले शरीर लवकरच चांगले बनेल आणि काही न करता सुद्धा वजन वाढू लागेल आणि तुमचे सडपातळ शरीर काही दिवसांमध्येच मजबूत आणि पिळदार दिसू लागेल त्याबद्दल..
आपल्या शरीराचे वजन वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि जास्त फॅट असणारे पदार्थ सुद्धा यांचा समावेश करणे गरजेचे आहे. हेल्दी फॅट साठी आपल्याला दूध व दही यांचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. बाजारामध्ये जे पाकीट मधील दूध मिळते त्यावर मोठ्या प्रमाणावर साय तयार होत असते आणि हीच साय आपल्या शरीरामध्ये प्रोटीन निर्मितीसाठी मदत करत असते आणि यामुळे कमी वेळात सुद्धा आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त होत असतात.
जर आपण दिवसभरातून एक ग्लास दही आणि रात्री झोपताना एक ग्लास दूध नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फॅट उपलब्ध होतात. दुधामध्ये व दही मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असल्याने यामुळे आपले वजन तर वाढतेच पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील हाडांची स्थिती सुद्धा चांगली राहते.
त्याचबरोबर कमी वेळामध्ये योग्य वजन प्राप्त करण्यासाठी आपण पीनट व मियोनिझ सुद्धा खाऊ शकतो. पीनट हे शेंगदाणे पासून बनलेले असते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते आणि मियोनिझ हे दही हंडी प्रोटीन या तिघांच्या मिश्रणाने बनलेले असते म्हणूनच आपण आठवड्यातून दोन वेळा जरी मियोनिझ खाल्ले आणि तीन ते चार वेळा ब्रेड सोबत पीनट लावून सेवन केले तर लवकरच आपले वजन वाढू लागेल.
देशी तूप सेवन केल्याने आपल्या शरीराला खूप सारे पोषक तत्व प्राप्त होतात आणि त्यामुळे जर आपण दिवसभरातून चपाती सोबत तूप लावून खाल्ल्यास आपल्याला ऊर्जा सुद्धा मिळते. जर आपण रात्री झोपताना पाण्यामध्ये ड्रायफूट म्हणून एक बदाम ,अंजीर,मनुके भिजवून सकाळी उठल्यावर जर हे पदार्थ सेवन केले तर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स आणि ऊर्जा प्राप्त होते आणि त्याचबरोबर आपले सडपातळ शरीर लवकरच पिळदार बनण्यासाठी मदत होते यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त होतात पण त्याच बरोबर डोळे सुद्धा चांगले राहतात ,नजर चांगली बनते, शरीरातील हाडे मजबूत बनतात व आपले हृदय सुद्धा मजबूत बनते.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.