चेहऱ्याला फक्त 1 वेळालावा; पिंपल्स गायब, काळे डाग होतील नाहीसे.. चेहरा इतका सुंदर होईल की….

आरोग्य

आजीबाईचा बटवा बऱ्याच जणांना आवडतो, म्हणजेच आपण घरगुती, परस बागेतील वस्तू, वनस्पती आपल्या निरोगी आयुष्यासाठी व सौंदर्यासाठी वापरतो. यांचा कोणताही साईड इफेक्ट नसतो. आपल्या मुलायम, चमकदार त्वचेसाठी नेहमीच काही न काही उपाय करत असतो,

खूप सारे केमिकल्स असलेली सौंदर्य प्रसाधने सर्वांसाठी सूट होतील असे नसते. म्हणून ज्यांचा कोणताही साईड इफेक्ट नाही व परिणाम सुद्धा दिसून येतो असे काही घरगुती उपाय नक्की करून पहा. आपल्या किचन मधील बटाटा आपल्या चमकदार त्वचेसाठी कसा फायदेशीर आहे हे आपल्याला माहीत असायलाच हवे.

कच्चा बटाटा आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे व तो आपल्या त्वचेला मुलायम व चमकदार बनवतो. चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील, चेहऱ्यावरील त्वचा ओढल्यासारखी वाटत असेल तर कच्या बटाट्याचा तुकडा चेहऱ्यावर लावा. बटाट्यात अँटी एजिंग गुणधर्म असतात जे चेहऱ्यावर तेजस्वीपणा आणतात.

तसेच जर चेहऱ्यावर डाग असतील, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे असतील तर हा कच्चा बटाटा आपण चेहऱ्यावर लावू शकतो. तसेच ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी चेहऱ्यावरील ड्रायनेस घालवण्यासाठी कच्चा बटाटा वापरा. पण हा कच्चा बटाटा दह्यात मिक्स करून लावायला हवा.

हे वाचा:   अनशापोटी गूळ फुटाणे खाल्ल्याने हे भयंकर 10 रोग मुळापासून नष्ट होतात..अतिशय चमत्कारिक फा’यदे होतात ! जाणून घ्या

त्यामुळे त्वचा खूप मुलायम बनते. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला सन बन झाल्यास तुम्ही हा बटाटा चेहऱ्याला लावा. त्यासाठी बटाट्याचे काप करून फ्रीज मध्ये ठेवा व नंतर चेहऱ्यावर लावल्यास आराम मिळतो. चेहऱ्यावरील सर्व डार्क स्पॉट्स देखील हा बटाटा दूर करतो.

काही जणांना फेसियल सूट होत नाही त्यांनी बटाट्याचा वापर केल्यास परिणाम नक्की दिसून येईल. बटाटा हा नैसर्गिक क्लीनझर आहे, कच्चा बटाटा चेहऱ्यावर लावल्याने चेहरा स्वच्छ होतो, चेहऱ्यावरील सर्व धूळ निघून जाते व चेहरा चमकदार बनतो. एक बटाटा घेऊन स्वच्छ धुवून घ्या व त्याचे स्लाइस बनवून घ्या.

यातील एक स्लाइस चेहऱ्यावर स्क्रब करतो तसे करा, 5 मिनिटे हा स्लाइस चेहऱ्यावर घासावा. त्यानंतर चेहरा 7 ते 8 मिनिटे सुकवा, ज्यामुळे त्यातील तत्व काम करतील त्यांनंतर चेहरा साध्या किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय तुम्ही 2 ते 3 दिवसांनी पुन्हा पुन्हा करू शकता, चेहरा चमकदार होईल.

हे वाचा:   प्रतिकारशक्तीसाठी वाढवण्यासाठी गुळवेलचा करा असा वापर; पण हे तीन आजार असणाऱ्या लोकांनी चुकनही वापरू नये.!

याचा परिणाम तुम्हाला 15 दिवसातच जाणवेल. तर असे आहेत कच्च्या बटाट्याचे फायदे, घरच्या घरी तुम्ही नैसर्गिकरित्या चेहरा सुंदर आणि मुलायम नक्कीच बनवू शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *