बोराची पाने केस केस गळणे करतील कायमचे बंद; फक्त या पानांचा अशाप्रकारे करा वापर.!

आरोग्य

इतरांचे लांबसडक काळेभोर केस पाहिले तर आपल्याला सुद्धा वाटते की आपल्या के सुद्धा लांबसडक काळेभोर असायला हवे आणि हे काळेभोर केस दिसण्याकरता आपण वेगवेगळे रासायनिक पदार्थांचा वापर करत असतो. अनेक रासायनिक पदार्थ समावेश असलेले उत्पादन बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असतात. हे उत्पादन वापरल्यामुळे अनेकदा आपले केस काळे होतात लांब होण्यासाठी मदत होते परंतु यांचा भरपूर प्रमाणामध्ये वापर केल्याने कुठेतरी आपल्या केसांवर विपरीत परिणाम सुद्धा होऊ लागतो व परिणामी केस गळू लागतात.

अकाली पांढरेपण येऊ लागते ,केसांमध्ये कोंडा निर्माण होऊन जातो, केस कमकुवत बनतात आणि या सगळ्या समस्या आपल्याला भविष्यात सतावू लागतात म्हणूनच या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आणि तुमचे केस नैसर्गिक दृष्ट्या काळेभोर व लांब बनवण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या केसांच्या समस्या पूर्णपणे दूर होणार आहे व तुमचे केस सुद्धा काळेभोर लांबसडक पण होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ वापरायचा आहे,तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे व त्याचबरोबर आपण जी वनस्पती हा उपाय करण्यासाठी वापरणार आहोत ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सुद्धा पाहायला मिळते आणि या वनस्पतीचे फळ आपण हमखास खात असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बोराच्या झाडाची पान घ्यायचे आहे.

हे वाचा:   मटण खाल्यावर ही एक चूक अजिबात करू नका.. शरीरावर होणारे गंभीर परिणाम पाहून टेंशन मध्ये याल.!

बोर हे आपण हिवाळ्यामध्ये नेहमी खात असतो. चवीला आंबट-गोड असतात आणि यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्त्वे उपलब्ध असतात याचे आपल्याला पान हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. आपल्याला बोराचे पान घ्यायचे आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचे आहे. बोरचे पाने हे आपले केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करत असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्या दुसरा घटक पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे कडुलिंबाच्या झाडाचे पाने. कडुलिंबाची पाने आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे व त्याचबरोबर विविध आजारांवर कडू लिंबाच्या पानांचा वापर केला जातो. ज्या पद्धतीने आपण बोरचे पान घेतले आहे त्याच पद्धतीने आपल्याला प्रमाणात कडुनिंबाची पाने घ्यायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांची पेस्ट बनवायची आहे.

ही पेस्ट कॉटनच्या कपड्याने गाळून जो रस तयार होईल तो रस आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापरायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय दोन पद्धतीने आपण करू शकतो तो म्हणजे एका वाटीमध्ये रस घेतल्यानंतर आपण शाम्पू टाकायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचा आहे व दुसऱ्या वाटीमध्ये रस घेतल्यावर आपण जे नेहमी तेल वापरतो असे खोबरेल तेल घ्यायचे आहे आणि हे मिश्रण एकत्र करायचे आहे.

हे वाचा:   पावसाळ्यात उगवणारी ही चमत्कारी वनस्पती कसलाही मुळव्याध मुळासकट पूर्ण घालवेल.!

जे तेल टाकलेले मिश्रण आहे ते आपल्याला रात्री झोपायच्या वेळी डोक्याला लावायचे आहे त्याने हलका मसाज करायचा आहे व वाटी मध्ये आपण शाम्पू वापरलेला आहे ती वाटी आपल्याला सकाळी उठल्यावर केसांना लावायचा आहे त्यानंतर केस स्वच्छ धुवायचे आहे, अशा पद्धतीने केसांच्या वाढीसाठी व केस लांबसडक काळेभोर करण्यासाठी आपण हा उपाय दोन वेगळ्या पद्धतीने करू शकतो.

हा उपाय सातत्याने पंधरा दिवस जरी केला तरी तुमचे केस लांब होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर तुमच्या केसांमध्ये कोणतेही इन्फेक्शन झाले असेल तर ते इन्फेक्शन या दोन्ही पदार्थामुळे दूर होणार आहे. तुमचे केस चमकू लागणार आहेत.केसांमध्ये कोणती फंगल इन्फेक्शन झाले असेल किंवा कोंडा झालेला असेल तो पूर्णपणे दूर होणार आहे म्हणूनच आपल्या केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *