पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण अनेकदा भिजतो आणि ज्यामुळे आपले कपडे ओले असतात .जास्त वेळ शरीरावर कपडे ओले असल्याने अंगावर लाल चट्टे निर्माण होणे ,अंगाला खाज निर्माण होणे, खरूज, नायटा यासारख्या समस्या आपल्याला सतावू लागतात. या समस्येकडे आपण दुर्लक्ष केले तर ही समस्या कालांतराने त्वचाविकार म्हणून आपल्या समोर उभी राहते म्हणूनच जर तुमच्या बाबतीत सुद्धा या समस्या निर्माण होत असतील तर वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.
तसेच इतर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खाज, खरूज,नायटा , गजकरण यासारख्या समस्येवर वेगवेगळे उपचार सांगण्यात आलेले आहे. आजच्या लेखामध्ये सुद्धा आपण असाच एक उपचार जाणून घेणार आहोत. या उपचाराच्या माध्यमातून खाज, खरुज नायटा कितीही जूना असला तरी दोन दिवसांमध्ये तो मुळापासून नष्ट होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटी वापरायचे आहे .तुरटी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये व वैज्ञानिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेली आहे. तुरटीच्या अंगी असे अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जीवजंतू असतील तर ते नष्ट होण्याची क्षमता तुरटी मध्ये असते.
तुरटीचा अनेक वर्षांपासून वापर केला जातो. पाण्यामधील कीटक नष्ट करण्यासाठी सुद्धा तुरटीचा वापर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जर आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची त्वचा विकार व फंगल इन्फेक्शन असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा तुरटी उपयुक्त ठरते. तूरटी ही अँटी सेप्टिक म्हणून ओळखले जाते म्हणूनच अनेकदा शेविंग केल्यानंतर तुरटी चेहर्यावर लावली जाते जेणेकरून र”क्त आले असेल तर ते र”क्तप्रवाह थांबण्यासाठी तुरटी मदत करते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी मध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुरटीचा खडा टाकायचा आहे व तुरटी युक्त हे पाणी ज्या ठिकाणी आपल्या शरीरावर खाज खरुज व प्रभावीत जागा आहे अशा ठिकाणी ते पाणी आपल्या लावायचे आहे, असे केल्याने शरीरावरील कोणत्याही प्रकारची फंगल इन्फेक्शन दूर होण्यास मदत होणार आहे.
आता ज्या ठिकाणी खाज निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी आपण तुरटीच्या सहाय्याने ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरा अजून एक पदार्थ लागणार आहे ती म्हणजे हळद आणि मोहरी तेल. हळद हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अँटी बॅक्टरियल म्हणून ओळखले गेलेली आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा हळद आणि एक चमचा मोहरी चे तेल घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून ज्या ठिकाणी खाज निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी हे मिश्रण आपल्याला लावायचे आहे. हे मिश्रण आपल्याला रात्रभर तसेच ठेवायचे आहे त्यानंतर सकाळी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे, असे जर आपण महिनाभर जरी केले तरी आपल्या शरीरावर खाज निर्माण झालेली आहे ती पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.