मित्रांनो हे कलियुग आहे इथे माता कोण आणि पिता कोण ? आपलीच माणसे आपल्याला परक्या सारखी वागणूक देतात. द्वापर युगामध्ये श्रावण बाळा कावड खांद्याला बांधून आपल्या आई वडिलांना काशीच्या यात्रेला घेऊन गेला होता. सोबतच माता व पिता यांना विश्व समजून श्री गणेश भगवंतांनी माता लक्ष्मी व महादेव श्री शिव शंकर यांची प्रदक्षिणा घातली होती. मात्र आज काल चे चित्र काही उलटच पहायला मिळते.
आज कालची मुले आपल्याच आई-वडिलांना घराच्या बाहेर काढतात व त्यांना आपल्या बायकोच्या नादी लागून ना-ना प्रकारचे त्रास व यातना देतात. आज आपण अश्याच एका माऊली बद्दल जाणून घेणार आहोत या माऊली बद्दल एकलत तर तुमच्या सुद्धा अंगावर काटा येईल. हो तुम्ही देखील विचार कराल की आपल्या सख्या आई सोबत अस ही कोणी वागू शकते का ? आता क्षणभर ही विलंब न करता जाणून घेऊया नक्की काय घडले या माऊली सोबत.
मित्रांनो मानव हा बोरिवलीत राहणारा एक साधा सरळ मुलगा होता. मानव आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो इयत्ता दहावीत शिकत होता. मानवची शाळा त्याच्या घरा-पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर होती आणि तो नेहमी पायी चालत ये जा करत असे. तो ज्या रस्त्याने जात असे तिथे एक स्म’शान भूमी व त्याच्या बाहेर एक म्हातारी बाई एक चादर व एक फुटके ताट घेऊन बसत असे.
मानव त्या गरीब म्हातारीला जाता येताना रोज बघत असे. एकदा मानवाने तिला खायला आपल्या डब्यातील उरलेली एक चपाती दिली. ती म्हातारी खूप भुकेलेली होती. तीने पटकन ती चपाती खाऊन टाकली व हात जोडून मानवचे आभार मानले. मानवने ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगितले व त्याच्या आई वडिलांनी त्याला रोज एक जास्त चपाती त्या म्हातारीसाठी देण्यास सुरवात केली. अशी अनेक वर्षे उलटली व पुढच्या अभ्यासासाठी शिक्षणासाठी मानव पुण्याला जायला निघाला. तेव्हा तो जाताना त्या म्हातार्या आजीला भेटायला गेला. त्याला जाताना पाहून ती आजी खूप भरवून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली.
आजी म्हणाली ‘माझा नातू पण आता तुझ्या वयाचा झाला असेल. तो ही तुझ्यासारखा मोठ्या शाळेत असेल. मला माझ्या मुलाने मुंबई फिरवतो म्हणून इथे आणले होते मात्र मला तो इथेच टाकून निघून गेला आणि मी अडाणी इथेच रडत बसली मात्र नंतर याची सवय झाली. तू शिक खूप मोठा हो आपल्या आई-वडिलांना कधीच एकटा सोडून जाऊ नकोस.
डोळ्यात ओलावा घेऊन मानव पुण्याला गेला पाच वर्षांनंतर तो परत बोरिवलीत आला आणि तो सरकारी मोठा ऑफिसर झाला ही गोड बातमी सांगायला तो पहिला त्या आजीकडे धावत गेला सोबत त्याने गोड खाऊ म्हणजेच पेढे सुद्धा घेतले होते. तो तिथे पोहचला बघतो तर काय तिथे ना आजी होती ना तिची फाटकी चादर तिथल्या आजू बाजूच्या लोकांना विचारपूस केल्या नंतर त्याला कळले की कही महिन्यांपूर्वी आजी या जगातून निघून गेली. मानवाला खूप मोठा धक्का बसला पाणावलेल्या डोळ्यांनी घरी परतला. मित्रांनो आपले आई वडिल हे आपल्यासाठी दैवत असतात त्यांचा कधी ही अनादार करु नये. त्यांच्या एवधे प्रेम आपल्याला या जगात कोणीच देऊ शकत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.