या पुरातन तेलाने टक्कलवर येतील भरभरून केस; सफेद केस होतील पुन्हा काळे.!

आरोग्य

मित्रांनो आपले केस मजबूत, सुंदर, काळेभोर राहून केस गळू नये यासाठी अत्यंत साधा सोपा उपाय घेऊन आली आहे. हा उपाय केल्याने कितीही केस गळत असतील तरीही १५ दिवसांतच तुमच्या केस गळतीच्या समस्या निघून जातील. तसेच याचा जर तुम्ही वारंवार वापर केला तर तुमचे जे अकाळी पांढरे झालेले केस आहेत तेसुद्धा काळेभोर, सुंदर, लांबसडक आणि चमकदार होण्यास मदत होईल. त्याचप्रकारे केसांमध्ये जर कोंडा असेल तर कोंडा देखील निघून जातो आणि केसांना कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या निघून केस भरभरून वाढण्यास मदत होणार आहे. याचा वापर आपण लहान मुलांपासूम ते मोठ्यांपर्यंत सर्वांवर करू शकतो. हा खूप इफेक्टिव्ह आणि फायदेशीर उपाय आहे.

मित्रांनो यासाठी प्रथम आपल्यला लागणार आहे कोरफड. कोरफड घेऊन हि प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कोरफड घेताना हि जाड घ्यायची आहे अगदी कोवळी घ्यायची नाही. आता कोरफडीच्या दोन्ही बाजूंचे काटे कापून घ्या व मधोमध याला चिरून घ्यायचे आहे. आता मित्रांनो आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो आहे मेथीदाणे. आता हे मेथीदाणे आपल्याला मधोमध कापलेल्या कोरफडीमध्ये टाकायचे आहेत.

यानंतर मेथीदाणे भरलेल्या कोरफडीचे थोडे मध्यम तुकडे करून ते धाग्याने किंवा दोरीने बांधून एका भांड्यात ठेवून द्यायचे आहे. हे न बांधता तुम्ही नीट पॅक करून सुद्धा ठेवू शकता परंतु बांधून ठेवल्याने मेथीदाणे आणि कोरफड नीट मिक्स होऊन त्याचा जास्त इफेक्ट दिसेल. हे एका भांड्यात बंद ठेवून ज्या ठिकाणी जास्त हिट असेल तिथे हे भांडे ठेवून द्यायचे आहे. हे किमान १२ ते १५ तास असेच ठेवून द्यायचे आहे. १२ ते १५ तासांनंतर या मेथीच्या दाण्यांना छान मोड आलेला असेल. आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे.

हे वाचा:   चरबीच्या गाठी घालवा ते सुद्धा ऑपरेशन न करता; करा हा रामबाण घरगुती उपाय..दोन दिवसात फरक पहा..अनेक जणांना रिझल्ट आला आहे.!

हा उपाय अत्यंत पारंपरिक आणि जुनाट आहे या उपायामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. यानंतर आपल्याला येथे २ वाट्या भरून खोबरेल तेल घ्यायचे आहे आणि ते एका भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर जे आपण कोरफड आणि मेथीच्या दाण्याचे मिक्सर मध्ये मिश्रण तयार केले आहे ते संपूर्ण या तेलामध्ये टाकायचे आहे. किमान अर्धा लिटर तेल या उपायासाठी वापरायचे आहे. मंद आचेवर हे तेल उकळवून उकळवून तयार करायचे आहे. हे तयार करताना मंद आचेवरच करा म्हणजे छान ते तयार होते याचा अर्क सम्पूर्ण या तेलात छान उतरतो. जर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करत नसाल तर तुम्ही जे तेल वापरता केसांसाठी त्या तेलाचा देखील तुम्ही येथे वापर करू शकता.

एलोवेरा जेल मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, कोलीन बी१,बी२,बी६ व बी१२ भरपूर प्रमाणात असत आणि म्हणूनच केसांचे आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी कोरफड अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. तसेच यामुळे डोकेदुखीचा त्रास देखील निघून जातो, उष्णतेचा त्रास असेल, शांत वाटत नसेल तर या समस्या देखील निघून जातात. त्याचप्रमाणे मेथीच्या दाण्यांमध्ये देखील पोटॅशिअम, आयरेन, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी हि तंतू भरपूर प्रमाणात असतात आणि म्हणूनच केसांचे आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी मेथीचे दाणे अत्यंत उपयुक्त ठरतात.

मेथीच्या दाण्यांमुळे आपल्या केसांचा रंग टिकून राहतोच परंतु केस मजबूत, चमकदार, काळेभोर होऊन केसांना एक नैसर्गिक चमक येते व नैसर्गिकरित्या केस वाढण्यास देखील मदत होते. एवढा इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला या तेलामुळे मिळणार आहे. हे तेल छान गरम होऊन तयार झाले की हे गाळून घ्यायचे आहे. गाळून घेतलेल्या तेलाने आठवड्यातून किमान २ वेळेस तरी रात्री झोपण्यापूर्वी किंवा अंघोळी आधी जरी तुम्ही २ तास या तेलाने केसांना मसाज केली आणि मसाज करताना स्कॅल्प पासून ते केसांच्या टोकापर्यंत छान मसाज करायची आहे.

हे वाचा:   पिवळ्या दातांवर हा पदार्थ घासा; पिवळे झालेले दात अगदी मोत्यासारखे चमकू लागतील.!

या तेलामुळे केसांच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी सहजतेने निघून जातील आणि केस धुवताना देखील फक्त रिठे आणून हे पाण्यात छान उकळवून घ्यायचे आहे आणि गाळून या पाण्याने चॅन शाम्पू ज्याप्रमाणे आपण लावतो त्याप्रमाणे लावून अंघोळ करायची आहे. यामुळे जर तुमचे टक्कल जरी पडले असेल केसांच्या कितीही समस्या असतील तरी देखील पूर्णपणे बरे होण्यास मदत होणार आहे.

रिठे जर तुम्हाला समजत नसतील तर ते ऑनलाइन किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्ये अगदी सहजतेने मिळतात. याची पावडर देखील मिळते ते तुम्ही सहजतेने वापरू शकता. जर तुम्ही रिठे वापरत नसाल तर जो शाम्पू वापरता त्याने केस धुतले तरी देखील चालेल. परंतु रिठे वापरल्यामुळे आपल्याला जास्त परिणामकारी रिसल्ट दिसून येतो. टक्कल जर पडले असेल तर ते देखील निघून जाईल म्हणून तुम्ही रिठा वापरू शकता किंवा फक्त या तेलाचा वापर केला तरी देखील चालेल. आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचुरल उपाय. नक्की करून पहा हा उपाय तुम्हला याचा नक्की फायदा होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *