बदलत्या काळानुसार, आजकाल सर्वच वयोगटातील लोकांना कोलेस्टेरॉलचा समस्या निर्माण झालेले आहे.त्यामुळे तरुण, मध्यम वयोगटाचे लोकं आणि वृद्धांना सावध राहण्याची आवश्यकता आहे. तसा आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल पातळी वाढत असल्याचे आपल्याला जाणवत नसल्यामुळे, आपण निवांत राहतो आणि मग नंतर परिस्थिती हाताळणे फार कठीण जाते.
त्यामुळे वेळीच याची लक्षणे दिसून आल्यास, सावध होणे गरजेचे आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट बाब म्हणजे, मानवी शरीराला कॉलेस्ट्रालची गरज असते. कारण कोलेस्टेरॉल हे असे केमिकल कंपाउंड असते,जे आपल्या पेशींच्या निर्माण आणि हा-र्मोन्ससाठी अत्यंत गरजेचे असते. परंतू शरीरात याचे प्रमाण वाढल्यावर समस्या उद्भवू लागतात.
तसेच आपल्याला हृदयाचे आजार, हृदयविकार, पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका आपल्याला वेढून घेतो. त्यामुळे कोलेस्टेरोलचे प्रमान आपल्या रक्तामध्ये जर ठराविक पातळीच्या पुढे गेल्यास, आपल्याला हृदयविकार येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे खाण्यात तेलकट पदार्थांचा जास्त वापर करू नये. कारण आपण जास्त प्रमाणात तेलयुक्त पदार्थांचे सेवन करीत असाल, तसेच धुम्रपान करत असाल तर यामुळे सुध्दा शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी जास्त प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे वेळोवेळी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीची पाहणी करणे, खूप महत्वाचे ठरते.
याशिवाय जर आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी वाढल्यास काही कारणे दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने, जर आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल प्रमाण जास्त असल्यास थोडेसे कामाने किंवा परिश्रममाणे लगेच दम लागतो किंवा धाप भरते. तसेच जास्त काळ उभे राहू वाटत नाही. सतत आपले पाय दुखू लागतात. तसेच चालताना, पळताना किंवा उठताना आपले गुडघे दुखू लागतात.
याशिवाय जर आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास,अगदी थोडेसे काम केल्यास, लगेच प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो तसेच अशक्तपणा जाणवतो. अगदी थोडी हालचाल केल्यास, लगेच थकवा जाणवतो, खूप घाम येतो. तसेच आपले अचानक वजन वाढणे ,हे शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी जास्त असल्याचे लक्षण मानले जाते.
तसेच जास्त प्रमाणात जास्त चरबी युक्त पदार्थांचे सेवन केल्यास,कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. लठ्ठपणा तसेच व्यायामाचा अभाव आणि यावेळी जेवण असणे, हे ही कोलेस्ट्रॉल वाढीचे कारण आहे.याशिवाय एका संशोधनात आढळले की अल्कोहोल,मधुमेहने कोलेस्ट्रॉल प्रमाण वाढते,
शिवाय रक्त धमन्या खराब होऊन त्यात कोलेस्ट्रॉल जमा होते याचबरोबर उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.त्यामुळे तुम्हाला वरील पैकी जर एका पेक्षा जास्त लक्षणे दिसून आल्यास, आपण डॉ=क्टरांची भेट घेऊन, योग्य उपचार करणे गरजेचे आहे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.