केव्हाही 2 तुळशीचे पाने घेऊन करा हा उपाय; घरात कधीच कसली कमी भासणार नाही.!

अध्यात्म

मित्रांनो तुळसीची पाने ही अगदी चमत्कारिक असतात आणि यांच्या सेवन मात्राने अनेक आजार बरे होतात असे आम्ही नाही तर हिंदू आयुर्वेद ग्रंथ या मध्ये नमूद केलेले आहे. हो केव्हाही दोन तुळशीची पाने घेऊन करा हा उपाय कधीच तुमच्या घरात कसलीच कमी होणार नाही आणि नेहमीच तुमच्या घरात बरकत राहील धनधान्याची, सुखाची, आनंदाची.

हा उपाय अगदी सोपा आहे व कोणी ही हा उपाय करु शकते. या उपाया द्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात हरवलेला आनंद परत आणू शकता हा उपाय तुमच्यासाठी कोणत्या चमत्करापेक्षा कमी नाही आहे म्हणूनच हा आमचा लेख शेवट पर्यंत वाचा. चला तर विलंब न करता आमच्या या लेखात पाहूया काय आहे हा उपाय व याचे फायदे.

मित्रांनो दोन तुळशीची पाने केव्हाही घ्यायची आहेत. तुम्ही आज घ्या, उद्या घ्या, परवा घ्या, पुढच्या महिन्यात घ्या, रविवारी घ्या जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल सकाळी, संध्याकाळी, दुपारी. केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी, त्या वेळी तुम्हाला फक्त तुमच्या घरच्या तुळशीची दोन पाने घ्यायची आहेत आणि एक लक्षात ठेवा कि एकादशीच्या दिवशी किंवा संध्याकाळी, कोणत्याही संध्याकाळी तुळशीची पाने तोडायची नाही आहेत.

तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करता येईल परंतु तुम्ही कोणत्याही दिवशी संध्याकाळी व एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी सकाळीच किंवा दुपारीच तुम्हाला तुळशीची पाने तोडून ठेवायची आहेत. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कि एकादशीच्या दिवशी आणि कोणत्याही दिवशी संध्याकाळी तुळशीला जराही हात लावायचा नाही.

हे वाचा:   कोणत्याही सोमवारी गळ्यात घाला असा रुद्राक्ष; नोकरी प्राप्तीचे योग जुळून येतील, नोकरी मिळण्यासाठी उपाय.!

त्यामुळे तुळशीची पाने अगोदरच तोडून घ्यायची आहेत आणि नसेल तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी हा उपाय करू शकता. तर दोन तुळशीची पाने तोडून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दोन तुळशीची पाने तोडून घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने साफ करून धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर ती दोन तुळशीची पाने देवघरात ठेवायची आहेत. हळद, कुंकू आणि अक्षदा टाकून तुळशीच्या पानांचे पूजन करायचे आहे.

त्यानंतर अगरबत्ती, दिवा लावून त्या तुळशीच्या पानांची ओवळणीही करायची आहे. त्यानंतर हात जोडून तुम्हाला || श्री स्वामी समर्थ | श्री स्वामी समर्थ|| असे अकरा वेळेस बोलायचे आहे. अकरा वेळेस या मंत्राचा जाप करुन झाल्यानंतर तुम्हाला हात जोडूनच मनापासून प्रार्थना करायची आहे की आपल्याला बरकत मिळू दे, कसलीही कमी होऊ देऊ नका, सगळ्या गोष्टी समाधानाने व शांततेने, आनंदाने जाऊदे, सगळ्यांचे रक्षण कर अशी प्रार्थना तुम्हाला हात जोडून करायची आहे.

मित्रांनो त्यानंतर नमस्कार करून तिथून उठायचे आहे आणि ती दोन तुळशीची पाने सुद्धा तुम्हाला तिथून उचलायची आहेत. त्यातील एक तुळशीचं पान तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये म्हणजेच कपाटामध्ये म्हणजेच जिथे तुम्ही पैसा,दागदागिने ठेवता तिथे ठेवून द्यायचे आहे. आणि दुसरं तुळशीचं पान तुमच्या घरामध्ये गहू, तांदूळ जेही भरलेलं असेल, साठवून तुम्ही वर्षाचं ठेवत असाल त्या कोणत्याही धान्यामध्ये तुम्ही ते तुळशीचे पान टाकून द्यायचे आहे.

हे वाचा:   घरात या दिशेला काढा स्वास्तिक..पैश्यांनी घर भरून जाईल..घरात सैदव सुखशांती राहील.!

नंतर त्या तुळशीच्या पानाला हात सुद्धा लावायचा नाही. गहू काढताना किंवा तांदूळ काढताना तुळशीचं पान जर तुम्हाला दिसलं किंवा आलं तुमच्याकडे तर ते पुन्हा त्या भांड्यात किंवा गोणीमध्ये जिथेही तुम्ही धान्य साठवून ठेवत असाल तिथे पुन्हा ते टाकून द्यायचे आहे. तसेच जे तुळशीचे पान तुम्ही तिजोरी मध्ये ठेवले आहे ते तिथेच कायमस्वरूपी राहू द्यायचे आहे. त्याला हात नाही लावायचा, काढायचे नाही, कधीच काहीच करायचे नाही. त्याला तिथल्या तिथेच राहू द्यायचे आहे. असा हा उपाय दोन तुळशीच्या पानांचा तुम्ही नक्की करा. तुम्हाला नक्की लाभ होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *