आपल्यापैकी अनेक जण काही वेळा चांगली कार्य करत असतात तर काही वेळा वाईट कार्य करत असतात. मनुष्य म्हटला की त्याच्या हातून कळत-नकळत पणे अनेकदा चुका घडून येतात परंतु जर आपण मुद्दाम काही चुका केल्या तर त्याचा परिणाम आपल्यावर गंभीर होऊ शकतो. म्हणूनच कोणतेही कार्य करत असताना आपल्याला चांगल्या हेतूने चांगल्या मनानेच करायला हवे.
अन्यथा तुमच्या हातून पाप घडू शकते त्याच बरोबर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक शास्त्रांमध्ये अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत जर आपण आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी ठरवून केल्या तर आपल्याला त्याचे पुण्य लावत नाही व त्या एवजी पाप च लागते आणि ह्या पापामुळे आपल्याला मरणा नंतर सुध्दा खूप साऱ्या संकटाला त्रासाला सामोरे जावे लागते.
शिव पुराणांमध्ये मनुष्यांनी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये याबद्दल अनेक दाखले देण्यात आलेले आहे.शंकर महादेवाने पार्वतीला सर्वप्रथम याचे ज्ञान दिले होत. शिव पुराणानुसार कलियुगात माणसाला सावध करण्यासाठी हे ज्ञान उपयोगी पडेल असे देखील सांगितले होते आणि म्हणूनच आपल्याला कली युगात वावरत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण चुकीचे कार्य केले, कोणाच्या भावना दुखावल्या तर यामुळे आपल्याला भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपण असे कोणतेच कार्य करू नये ज्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास सहन करावा लागणार असेल.
बहुतेक वेळा आपण अनेकदा इतरांच्या सौंदर्यावर, संपत्तीवर ,प्रगती वरती जळत असतो. आपल्याला त्यांचे सौंदर्य प्रगती बघवत नसते आणि म्हणूनच एखादी व्यक्ती आपल्याला पुढे जाऊ नये यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. ही चुकीचे प्रयत्न अत्यंत वाईट असतात आणि म्हणूनच जर तुम्ही सुद्धा असे काही कार्य करत असेल तर आत्ताच सावधान व्हा अन्यथा तुम्हाला भविष्यात वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते.
माणसाने इतरांचे कधीच वाईट चिंतू नये. नेहमी इतरांशी कसे चांगले होईल याचा विचार करावा. आपल्यासोबतच इतरांचा देखील विचार करावा जर आपण नेहमी इतरांचे वाईट चिंतेत असून एकमेकांबद्दल वाईट बोलत असू तर यामुळे आपले सुद्धा वाईट घडते आणि परमेश्वर त्या व्यक्तीवर कधीच प्रसन्न होत नाही. जी व्यक्ती नेहमी सर्वांचा विचार करते सर्वांना धरून चालते त्या व्यक्तीवर प्रश्न नेहमी कृपा वर्षाव करत असतात,त्यांच्या पाठिशि ऊभे राहतात. जी व्यक्ती आपल्या मुखा द्वारे नेहमी वाईट शब्द उच्चारत असतो चुकीचे वाईट बोलते अशा व्यक्तींच्या घरीदेखील माता महालक्ष्मी वास्तव्य करत नाही. जर तुम्हाला तुमच्या घरा मध्ये माता महालक्ष्मी वास्तव्य करावे असे वाटत असेल तर नेहमी इतरांचा मान सन्मान करायला हवा.
इतरांना वाईट बोलणे,शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे याला पाप असे म्हटले जाते कारण की आपल्या तोंडातून असे घाणेरडे शब्द बाहेर पडल्याने वातावरण बिघडून जाते आणि या वातावरणामध्ये एखादी व्यक्ती कदापि राहू शकत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या मुखातून चांगले शब्द बोलायला हवे. नेहमी सत्याला प्राधान्य द्यायला हवे. नेहमी खरे बोलायला हवे त्याचबरोबर शिवाचा जप नेहमी करायला पाहिजे. ज्या घरामध्ये शिवशक्तिचा जप केला जातो त्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदत असते.
त्यानंतर जी व्यक्ती शारीरिक पाप करते म्हणजे मुद्दाम कोणत्याही प्राण्याला मारणे, जनावरांना पक्षांना मारणे जीवे मारणे, वृक्षतोड करणे प्राचीन वस्तूंची तोडफोड करणे जेणेकरून आपल्या हाताने पायाने हे सगळ्या गोष्टी करत असतो. आपल्यापैकी अनेक जण इतरांना मुद्दामून त्रास देत असतात तर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर हे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि आपल्याला त्याचा जीव घेण्याचा अजिबात अधिकार नाही आणि म्हणूनच जर तुम्ही सुद्धा ही पाप करत असाल तर आत्ताच सावधान व्हा..
निंदा करणे अत्यंत चुकीचे आहे. जी व्यक्ती इतरांची निंदा करते त्या व्यक्तीला भविष्यात नेहमी निंदा सहन करावी लागते आणि म्हणूनच आपल्याला अशा चुकीच्या गोष्टी अजिबात करायचा नाही. जी व्यक्ती आपले आई-वडील, गुरू, शिक्षक वृद्ध व्यक्ती यांना विनाकारण त्रास देत असतो त्यांची निंदा करत असतो अशी व्यक्ती भविष्यात कधीच पुढे जात नाही त्यांच्या जीवनामध्ये नेहमी बरबादी दारिद्रता येते आणि विनाकारण सर्व ठिकाणी अपमान सहन करावा लागतो.
दिवसेंदिवस आपण अनेक ठिकाणी पाहतो की सगळीकडे चोरी झालेली आहे, खून दरोडा पडलेला आहे, हत्या झालेली आहे, एकमेकांना धमकीचे फोन येतात त्यानुसार अशा सगळ्या घटना पाप मानले गेलेले आहेत एखाद्या स्त्रीला छेडणे ,कुणाशी जबरदस्ती करणे हे यासाठीसुद्धा सांगितलेले आहेत त्या त्यामुळेच एखादी व्यक्ती कृत्य करते तर त्याला मरल्यानंतर खूप यातना सहन कराव्या लागतात.
जी व्यक्ती अशा प्रकारचे कृत्य करतील त्या व्यक्तीसाठी देवाच्या मनात अजिबात दया नसते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी अंधार पाहायला मिळतो. सर्व पाप करणाऱ्या लोकांना कधीही त्यांच्या जीवनामध्ये सुख संपत्ती वैभव लागत नाही आणि म्हणूनच या शिक्षेचा भयंकर दंड म्हणून या व्यक्तींना नरक प्राप्त होतो तसेच त्या व्यक्तींना पुढचा जन्म देखील अल्पायुषी मिळतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.