कुठे आहेस ? मी तिला संध्याकाळी सात वाजता कॉल केला. मरीन ड्राइव्ह वर निघाले आहे. क्या बात है. आताच मुलाला त्याच्या वडीलांकडे सोडलंय. फिलिंग लो. जरा समुद्र किनारी बसते. तिच्या ह्या बोलण्याने मला मनात चरर.. झाले. मी काहीच बोललो नाही. हॅलो हॅलो अरे आहेस का ? आहे आहे.. बोल. माझे शब्द जड झालेले मलाच जाणवलं. अरे इथे मुंबईत तुफान पाऊस आहे.
कॉल ट्रप्ट होतो ना म्हणून. छत्री आहे ना बरोबर ? तुला पाऊस सहन होत नाही. आहे.. आता पाऊस नाहीये. पण आला तरी आज मी भिजणार आहे. छत्री नाही वापरणार. का ? मी जवळ जवळ ओरडलोच. आज मला चार्ली चॅप्लिन आठवतो आहे. आज मला मनसोक्त भिजायचं आहे. म्हणून त्या ओघळणाऱ्या पाण्यात माझे अश्रू कोणी बघू शकणार नाही. यार प्लीज. छोडो यार.
तिने जोरात हसून विषयाला टाळायचा प्रयत्न केला. आज तू हवा होता इथे, ती म्हणाली. का ? खूप रडायचं आहे. एक आश्वासक मि’ठी आणि कुस हवी होती ओ गर्ल काश. कस असत ना माणसांचं. जे ज्यावेळी हवं ते मिळत नाही आणि म्हणूनच जे आहे त्यावरच समाधान मानायचं. तिचा दाटून आल होत. अग ही एक टेम्परेरी फेज आहे निघून जाईल. स्वतः ओढून घेतलेल्या गोष्टी टेम्परेरी नसतात. ठीक आहे.
काही निर्णय घेताना आपल्याला त्याचा रिझल्ट माहित नसतो. आपल्या दुर्दैवानं तू टाकलेले फासे उलट पडले. अरे राजा मला फासे टाकायची गरजच नव्हती. ती खिन्नपणे हसून म्हणाली. लेकिन वक्त बुरा हो ना तो सोच घास चरणे जाती है. मी समजू शकतो. आयुष्य चांगलं चाललं होतं कुठून हा आवडला आणि सगळं आयुष्य मेस अप झाले. पुरुषांचं बरं असत ना रे कितीही चुका करा, कितीही शेण खा..
पण त्याच्या पाठीशी त्यांची आईबाप असतात. चार शिव्या घालतील, पण त्यांना पदरात घेतात. आमचं तसं नाही ना एकदा घर सोडलं की, मुलगी परकी होऊन जाते. आणि त्यात आई-वडील नसतील तर फारच मा’नसिक त्रास. मला काय बोलावं ते कळत नव्हतं. इथे मस्त समुद्राच्या लाटा उसळत आहेत. तू लांब आहेस ना पाण्यापासून. हो रे राजा, इतकी लांब आहे की त्या उसळणाऱ्या लाटा माझ्यापर्यंत शांत होऊन येतात.
बहुतेक त्यांनाही माहित आहे की, त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लाटा सध्या माझ्या मनात उसळत आहेत. म्हणून मला त्या बाहेरून त्रा’स देत नाहीयेत. माणसांपेक्षा निसर्ग जास्त समजूतदार बघ. बर, अजून किती वेळ आहेस तिथे. तू घरी गेलीस की व्हिडिओ कॉल करतो तुला. मी येताना लाईटचे पाकीट घेऊन आले आहे. तुझ्याशी बोलत बोलत चार सि’गरेट झाल्यात. अजून सहा आहेत.
आज सगळ्या मा’रणार आणि मगच घरी जाणार. अजून दोन तास तरी इथेच आहे. आणि तिथून घरी म्हणजे पुढे दीड तासाचा प्रवास. जास्त रात्र व्हायच्या आधी जा घरी. उगीचच पावसात रिस्क नको. डोन्ट वरी, मला कुणी पळवून नेणार नाही. ती परत एकदा जोरात हसली. अग बाई तसं काही नाही. फक्त नीट आणि लवकर घरी जा इतकेच म्हणायचे आहे.
आणि काय करू लवकर घरी जाऊन मी आणि चार खोल्या तिथे साथ कुणाची, तर चार निर्जीव भिंतींचे. फक्त घरी गेलीस की मेसेज कर. मी जागा आहे तुझा मेसेज येईपर्यंत. नको रे राजा, तू तुझी वेळ झाली की झोप. मी करते मेसेज. तिचा कॉल झाला. रात्रीचे अकरा वाजले होते, तरी तिचा काहीच मेसेज नव्हता. असे नव्हतं की ती लहान होती. पण तिच्या मा’नसिक त्रा’सातून जात होती, त्यामुळे मला काळजी वाटत होती.
कसं असतं ना माणसांचं, ज्यांना नातं मिळतं त्यांना त्याची कदर नसते. नात्यांना टेकन फॉर ग्रांटेड घेतल जात. नात्यांचा खरा अर्थ आणि खरी किंमत अशांना विचारात ज्यांना ती मिळत नाहीत. काय चुकलं होतं हीच की त्याने सगळी जबाबदारी सोडून दुसऱ्या स्त्रीबरोबर निघून जावं आणि कधीतरी वाटतं की, काय अडलय तिचं एवढं, की अशा माणसा करता झुरत राहावं. तितक्यात मेसेज पिंग झाली.
मी पोहोचले, सुखरूप, सिंगल पीस. बघितलं तर रात्रीचे सव्वा बारा झाले होते. जेवली का नाही ? मी मेसेज केला. भूक नाही आणि बारा वाजून गेले एकादशी सुरू झाली. गुड नाईट हिरो. मी तिला गुड नाईट करून मोबाईल बाजूला ठेवला. रात्री तिचा विचार करता करता झोप लागली. सकाळी सहा वाजता उठून बघितलं तर गुड मॉर्निंग डियर, असा तिचा पहाटे पाऊने पाच वाजता मेसेज आला होता. बहुत मजबूत रिश्ता था उसका बहुत कमजोर और लोगो से.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.