या कामवाली सोबत मालकाने जे केले ते पाहून तुम्हीही चकित व्हाल.. पगार देताना तिच्यासोबत आणि ती देखील..

जरा हटके

मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी आमची मुलं सांभाळणाऱ्या छायाला माझ्या खोलीत बोलवलं. ती खोलीत आल्यावर म्हणालो, बस छाया, तुझा महिन्याचा हिशोब करुन टाकू. तू काही आपणहून मागणार नाहीस. त्यामुळे मलाच हे काम करावे लागणार. तर तुझे महिन्याला हजार रुपये ठरले होते. बाराशे.. नाही. तर हजार मी टिपून ठेवलं होत. आम्ही ह्या कामासाठी नेहमी हजारच देतो.

तर तू दोन महिने काम केलंस. तेव्हा दोन महिने आणि पाच दिवस. बरोबर दोनच महिने. मी तसं टिपून ठेवल होत. म्हणजे तुझे दोन हजार होतात. त्यातून नऊ रविवार वजा करून, तू छोटीकडे रविवारी बघितलं नाहीस. आणि तीन सुट्ट्या. छाया लालबुंद चेहऱ्याने नुसत्या आपल्या कुर्त्याशी चाळा करत बसली. तोंडून एक शब्द नाही. तर नऊ रविवार आणि तीन सुट्टया म्हणजे ३६० कमी झाले.

चार दिवस छोटी आ’जारी होती त्यामुळे तीच काम वाचलं. तीन दिवस तुझा काय म्हणे दात दुखत होता. म्हणून बाईने तुला जेवणानंतर सुट्टी दिली. ३६० आणि २१० म्हणजे ५७० वजा झाले. म्हणजे १४३० उरले बरोबर. छायाच्या उजव्या डोळ्यात लाली उतरली आणि हनुवटी थोडी थरथरल्यासारखी झाली. तिने थोडा खाकरल्यासारख केलं. पण तोंडानं हुं की चू नाही..

नवीन वर्षाच्या सुमारास तुझ्या हातून एक कपबशी फुटली. त्याचे १०० रुपये. खरं तर तो वडिलोपार्जित सेट मधला कप महागच होता, पण असो. याशिवाय तुझ्या दुर्लक्षामुळे छोटी एकदा झाडावर चढताना तिचं जॅकेट फाटलं, त्याचे २०० . आणखी तुझ्या नकळत कामवलीने बंडू चे बूट चोरले, तू लक्ष ठेवायला हवं होतस. तुला त्याचाच पगार मिळतो. म्हणजे तुझे आणखी १०० रुपये वजा.

हे वाचा:   बघा सासरचीच माणसं “सुनेला” दे ह विक्रीला भाग पाडतात तेव्हा..सकाळी सून तर रात्री दुसऱ्यासोबत लगट करायला पाठवतात…

गेल्या १० जानेवारीला तुला मी १०० रुपये दिले होते. नव्हते दिले तुम्ही.. छाया कुजबुजली. पण मी टिपून ठेवलंय की- बरं असेल.. तर १४३० मधून ५०० वजा झाले म्हणजे ९३० उरले. तिचे दोन्ही डोळे डबडबले. इवल्याश्या नाकावर राग जमला, बिचारी. मला आतापर्यंत फक्त एकदाच बाईंनी पैसे दिले होते. थरथरत्या आवाजात छाया म्हणाली. ते पण ३० रुपये फक्त. खरं की काय ? मी ते हिशोबात धरलेच नव्हते.

तर ९३० मधून ३० गेले म्हणजे ९०० उरले. हे घे तुझे ९०० रुपये. म्हणजे मी मोजून ९०० तिच्या हातावर ठेवले. थरथरत्या हाताने तिने ते आपल्या पर्स मधे ठेवले आणि मऊ आवाजात म्हणाली, थँक्यू.. मी ताडकन उठलो आणि संतापाने येरझारा घालायला लागलो. हे थँक्यू कशासाठी ? तुम्ही पैसे दिले म्हणून.. पण मी तुला चक्क फसवले आहे. तुझी लू’ट केली आहे. हे तुला माहीत असून, थँक्यू.?

हे वाचा:   प्रेयसी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म देत होती,प्रियकर घरी प्रेयसीच्या आईसोबत करत होता असे काही…

इतर कोणाकडे मला काहीच मिळत नाही म्हणून. कोणी काहीच देत नाही. बरोबर आहे. काही आश्चर्य नाही. मी मुद्दामच तुझ्याशी नाटक केलं. तुला धडा शिकवायला. तुला तुझा पूर्ण पगार २४०० देणार आहे मी. हा बघ पाकिटात घालून ठेवलाय. इतकं मुख दुर्बळ कोणी कसं असू शकतं. का तू गप्प राहतेस. का तू काहीच बोलत नाहीस. का अन्यायाचा प्रतिकार करत नाहीस.

कमाल आहे, अशाने उपाशी म’रशील तू. या जगात कोणी कसं इतकं, इतकं मुख दुर्बळ असू शकतं. ती नुसतीच हसल्यासारखी वाटली. तिचं स्मित म्हणजे मला थोड उपहासाच वाटलं. जणू ती म्हणत होती, असू शकतं. बघा की माझ्याकडे. अखेर मी तिची क्रूर थट्टा केल्याबद्दल मनापासून माफी मागून तिचं पाकीट तिला सपूर्त केलं. ओठातल्या ओठात थँक्यू थँक्यू पुटपुटत निघून गेली.

मी तिच्याकडे बघतच राहिलो. विचार करत होतो की दुर्बळांचं शो-षण करणं किती सोपं आहे ह्या जगात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *