तमिळनाडू राज्यात 48 वर्षीय सिल्वाराणी नावाची एक महिला आहे. ही महिला आपल्या पाळीव प्राण्यावर इतके प्रेम करते, की त्यामुळे या महिलेने चक्क लग्न केले नाही. हा पाळीव प्राणी एक बैल आहे. हा बैल घेऊन ही महिला तामिळनाडूचा पारंपारिक खेळ जल्लीकट्टू या स्पर्धेत भाग घेणार होती. या महिलेच्या कुटुंबातील सदस्य तिच्या जिद्दीच्या पुढे हा बैल पाळावा लागला.
जल्लीकट्टू या खेळाचा बैल पाळणे काही किरकोळ गोष्ट नाही असे म्हणणे त्या महिलेचे पालक आणि आजोबा मुथुस्वामी यांचे आहे. पण नंतर कालांतराने त्याच्या घरच्याना त्या सांडकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. मग या महिलेने आपल्या खांद्यावर या बैलाची जबाबदारी स्वीकारली.
पण जेव्हा परिवारामध्ये परंपरा आणि विवाह यापैकी एक निवडण्याची वेळ आली या सिल्वराणीने परंपरेला महत्त्व दिले. नवीन कुटुंबाची परंपरा जतन केली जाऊ शकते. कारण तिच्या परिवाराची या स्पर्धेत भाग घेण्याची कित्येक पिढ्याची परंपरा आहे. या बैलाचे नाव राम आहे.
सिल्वाराणी शेतात मजूर म्हणून काम करते, कामाच्या मिळकतीवर त्या सांडची पूर्ण खाण्याची व्यवस्था करते. तसेच या रामच्या प्रति तिचे प्रेम आणखी वाढते की तो प्रत्येक वेळी ही स्पर्धा जिंकून दाखवतो. प्रत्येक वेळी राम जिंकल्यानंतर घरात रेशीम साडी आणि सोन्याची नाणी मिळतात. पण आजपर्यंत तिने लग्नाचा विचार केला नाही. तिला असे वाटते की मी लग्न करून हे घर सोडले तर बैल एकटा राहू शकणार नाही इतकी या बैलाला तिची सवय झाली आहे.
तसेच अजून एक असे प्रकरण म्हणजे वाराणसीला राहणाऱ्या स्वाती यांनी आपल्या कुटूंबासह घरात 20 कुत्री, 13 मांजरी, 2 सांड , 1 गरुड आणि 2 डझनहून कबूतर आणि 5 डझनहून अधिक पक्ष्यांच्या इतर प्रजातीसह आपल्या घरात राहते. लहानपणी पासून प्राण्यांच्या प्रेमापोटी जर तिला कोठेही भटके प्राणी दिसल्यास त्याला घरी घेऊन येत असते.
एमबीए नंतर स्वातीने काही वर्षे आपली नोकरी केली, पण नोकरीमुळे ती आपल्या बेघर प्राण्यांची काळजी घेऊ शकत नव्हती आणि सर्वात मोठी समस्या अशी की घरी या प्राण्यांची काळजी घेणारे कुणीही नव्हते. यामुळे तिने नोकरी सोडून आपल्या बचतीच्या पैशातून या प्राण्यांची देखभाल करते. आता स्वाती लग्नाच्या वयाची झाली असून पण तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कारण तिला तिच्यासोबत या प्राण्यांना पसंत करणारा पती पाहिजे आहे. विकासजी आता 40 वर्षाचे झाले आहेत.त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. म्हणून यांना आठवड्यातुन 2 ते 3 वेळा हॉस्पिटलमध्ये डायलेसिस करण्यासाठी जावे लागते. पण विकासजी लहानपणी पासून मुक प्राण्यांची सेवा करत आहेत. आता ही आवड नसून एकप्रकारे छंद झाला आहे त्यामुळे यांनी 8 वर्षापूर्वी आपल्या परिवाराला या प्राण्यांच्या प्रेमापोटी सोडले.
यांनी म हा मा री च्या काळात रेड झोन मध्ये जाऊन प्राण्यांचा जीव वाचवला होता. एका घरात को-रोना झाल्यामुळे पुर्ण घर लॉक करून त्या परिवाराला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.पण विकासजी ना समजले की त्या घरात एक कुत्रे आहे. शेजाऱ्याने सांगितले की या कुत्र्याने 4 ते 5 दिवस काहीच खाल्ले नव्हते. मग विकासने काही सामाजिक संस्थाची मदत मागितली पण कोणीही रेड झोन मध्ये जाण्यास तयार नव्हते. विकासजी स्वतः जबाबदारी घेऊन त्या कुत्र्याचा जीव वाचवला.