घरात या दिशेला काढा स्वास्तिक..पैश्यांनी घर भरून जाईल..घरात सैदव सुखशांती राहील.!

अध्यात्म

आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी व सकारात्मकतेचा झरा वाढवण्यासाठी आपण आपल्या घरी आपल्या हिंदू ध र्म शास्त्रातील शुभ चिन्हे बनवू शकतो. देव देवतांनी खूप सारी शुभ चिन्हे आपल्याला सांगितली आहेत. तरी आपण घरी यांचा वापर आपल्या सुखी जीवनासाठी करू शकतो.

स्वस्तिकचे महत्व फक्त हिंदू ध-र्मातच नसून अन्य सर्व ध र्मात मानले जाते. स्वस्तिक आपल्याला लाभदायी असते, देव्हाऱ्यात रांगोळी नेहमी स्वस्तिक चिन्ह काढावे, तसेच अंगणात रांगोळी मध्ये सदैव स्वस्तिक काढून त्यांची पूजा करा त्यामुळे घराचे रक्षण होते व धनलाभ होतो.

स्वस्तिक या शुभ चिन्हामध्ये खूप मोठी सकारात्मक भावना असते. साक्षात देवाचा वास असतो. गणेश पुराणानुसार स्वस्तिकला गणेशजींचे प्रतीक मानले आहे. घरातील लक्ष्मी अबाधित रहावी, घरात सुख शांती नांदावी यासाठी घरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते.

जिथे जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते तिथे स्वस्तिक चिन्ह काढल्यास तेथील नकारात्मकता निघून जाते तसेच जिथे शुभ ऊर्जा आहे तिथे स्वस्तिक काढल्याने सकारात्मक ऊर्जा आणखीनच प्रबळ होते. स्वस्तिक जर उत्तर दिशेला काढले तर कुबेराची कृपा होऊन धन आपल्या घराकडे आकर्षित होते.

हे वाचा:   रोज देवपूजेत दिवा लावताना बोला हे 3 शब्द; कितीही मोठा शत्रू असुदे तुमच्यासमोर गुडघे टेकेलच.!

आपण जर पूर्वेला स्वस्तिक काढले तर घरातील सदस्यांची ऊर्जा प्रबळ होते, ते जास्त क्रियाशील होतात व त्यामुळे खूप मेहनती बनतात. ईशान्य कोपऱ्यातील स्वस्तिक आपले दुर्भाग्य सद्भाग्यात बदलते. आपली भरभराट होते. पश्चिम दिशेला स्वस्तिक काढणे म्हणजे आपले धनाचे स्त्रोत वाढणे होय.

जसे की इनकम येण्याचे अनेकविध मार्ग निर्माण होतात. नैऋत्य कोपऱ्यात स्वस्तिक चुकूनही काढू नये. त्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येते. तसेच आग्नेय कोपऱ्यात स्वस्तिक काढू नये. घराच्या मधोमध स्वस्तिक काढणे मंगलदायी असते. त्यामुळे सर्वत्र शुभ गोष्टी घडतात. कारण स्वस्तिक चारी बाजुंनी सकारात्मक ऊर्जा पसरवत असते.

तसेच स्वस्तिक कधीही तिरपे काढू नका, कारण त्यामुळे आपली मती सुध्दा तिरपी होते. उत्तर, ईशान्य, पूर्व दिशेला नेहमी स्वस्तिक काढा व ते सरळच काढा. तसेच या दिशांना स्वस्तिक काढताना त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या दोन दोन रेषा काढल्या जातात कारण स्वस्तिक मधून प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते.

हे वाचा:   भीतीदायक स्वप्न पडतात का.? झोपताना करा हा उपाय, भीतीदायक स्वप्न पडणार नाहीत.!

त्यामुळे ती थोडी मर्यादित राहावी यासाठी तसे केले जाते. स्वस्तिक नेहमी लाल रंगाचे असावे , तुम्ही कुंकूने देखील स्वस्तिक काढू शकता. अशा प्रकारे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी तुम्ही नेहमी स्वस्तिक काढू शकता.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *