आपल्या आयुर्वेदिक शास्त्र हे संपन्न शास्त्र आहे. आपल्या आजूबाजूला खूप सार्या औषधी वनस्पती उपलब्ध असतात परंतु मनुष्याला या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसते परिणामी मनुष्य या वनस्पतीचा उपयोग आपल्या शरीरासाठी व निरोगी आरोग्यासाठी अजिबात करून घेत नाही. या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.
दैनंदिन जीवनामध्ये आपल्यापैकी अनेकांना हाडांच्या समस्या, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, नेहमी थकवा जाणवणे, शरीरामध्ये ऊर्जा नसणे यासारखे अनेक समस्या त्रास देत असतात परंतु बहुतेक वेळा धावपळीच्या जीवनामध्ये आपण या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. या समस्या भविष्यात जीवघेणा आजार देखील म्हणून आपल्यापुढे उभे राहतात. आजच्या लेखामध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत, ती भविष्यात अतिशय उपयुक्त ठरणार आहे,चला तर मग जाणून घेऊया या उपायाबद्दल..
आजच्या लेखामध्ये आपण ज्या औषधी वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत, औषधी वनस्पतीचे नाव आहे बाभूळ. आपल्यापैकी अनेकांनी बाभूळ झाड पाहिले असतील परंतु या झाडाचा अनेकांना नेमका औषधी गुणधर्म व उपयोग काय असतो हे माहिती नसते. आपल्यापैकी अनेक जण डिंकाचे लाडू खात असतात. हे डिंक बाभुळच्या झाडापासून तयार झालेले असते. बाभुळचेवझाड हे सर्वगुणसंपन्न असे झाड आहे व या झाडाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा खूप सारे दाखले देण्यात आलेले आहे.
या झाडाचे पान, फूल,फळ, मूळ, चिकट द्रव्य पदार्थ म्हणजे डिंक इत्यादी सारे घटक मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त मानले जाते. या बाभूळच्या शेंगा देखील आपल्या शरीराला खूप सारे औषधी गुणधर्म प्रधान करत असतात. बाभूळच्या झाडा मध्ये खूप सारे विटामिन्स उपलब्ध असतात, जी आपल्या शरीराला आतून मजबूत करण्याचे कार्य करतात. या वनस्पतीच्या साल ने दात घासले जातात आणि म्हणूनच बाजारामध्ये सुद्धा बाभूळ पासून बनवलेले टूथपेस्ट सहजरीत्या उपलब्ध होतात.
आपल्यापैकी अनेकांना तोंड येण्याची समस्या वारंवार सतावत असते ,अशावेळी या वनस्पतीच्या पानांची पावडर किंवा वनस्पतीची पानं चावून चावून चघळल्याने आपल्याला त्वरित फरक जाणवेल परंतु ही पाने आपल्याला खायची नाही. चघळून बाहेर फेकून द्यायचे आहे असे केल्याने तुमचे तोंड येण्याची समस्या, शरीरात अतिरिक्त प्रमाणात निर्माण झालेली उष्णता कमी होऊन जाईल.
आजच्या लेखामध्ये आपण बाभळीच्या शेंगा असतात, त्याचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ बाभळीच्या शेंगा घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका कढई मध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहे. मोहरीच्या तेला मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील वेदना दूर करण्याचे कार्य करते म्हणूनच आपल्याला एक दोन चमचा मोहरी चे तेल घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला कढई गॅस वर ठेवून त्यामध्ये बाभळीच्या शेंगा टाकायच्या आहेत.
हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे, जोपर्यंत तेलाचा रंग बदलत नाही व या शेंगांचा सर्व अर्क तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण तसेच उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तेल गाळणी च्या साह्याने गाळायचे आहे अशाप्रकारे आपला हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे.
बाजारामध्ये बाभळीच्या शेंगाची पावडर देखील उपलब्ध असते आता त्यानंतर आपल्याला सुरुवातीला मोहरीच्या तेलाने ज्या ठिकाणी आपले गुडघे सांधे दुखतात अशा ठिकाणी हलकासा मसाज करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे तेल बनवलेले आहे, या तेलाचा उपयोग करायचा आहे.नियमितपणे आपला अर्धा ते एक तास हे तेल लावून आपल्या पायाची मालिश केली तर काही दिवसांमध्ये तुमच्या हाडांना संबंधित सर्व समस्या दूर होऊन जातील. शरीरातील वात रोग दूर होऊन जातील अशा प्रकारे तुमच्या शरीराला मजबूत देणारा हा उपाय खूपच लाभदायक ठरतो.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.