पुजा करताना मन स्थिर राहत नसेल, देवाच्या फोटोला पाहून मनात अ श्ली ल, वाईट विचार येतात.? यावर स्वामींनी दिले उत्तर..

अध्यात्म

भोंदू लबाड माणसे ही समाजाला लागलेली कीड असून तिचा बंदोबस्त वेळीच करावयास हवा, असं स्वामींचे मत होतं. समाजातील निष्क्रियतेवर ते नेहमीच आ घा त करीत. आळशी माणसाचे तोंडही पाहू नये असे स्वामी नेहमी म्हणत. बैलासारखे कष्ट करा असा त्यांचा सततचा आग्रह होता.

स्वामींचा कर्मवादावर भर होता. कोणी मनात विवंचना करीत बसल्यास, काय रे, तुजजवळ बैल नाहीत काय? असा प्रश्न महाराज करीत. मेहनत करून खावे. शेत करून खावे. असे ते सांगत. हा कर्मयोग श्री स्वामींनी सातत्याने सांगितला. आपणही स्वामींचे सेवेकरी असाल तर हा उपदेश आपल्याला माहीत असायलाच हवा.

काही वेळी मन खूप चिंतीत असते, काळजी करत असते त्यामुळे इच्छा असूनही आपण स्वामींची सेवा मनापासून करू शकत नाही. अशा वेळी मनात खूप वाईट विचार येतात. खूप वेळेस मनात भलते सलते विचार येतात. अशा वेळी स्वामींनी आपल्याला खूपच मदत करतील असे उपाय सांगितले आहेत.

हे वाचा:   काळी मांजर दिसताच करा हे 1 काम; 7 पिढ्या पैशांवर राज करतील.!

भारतीय संस्कृतीत परंपरा, चालिरिती यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. देशभरातील कोट्यवधी कुटुंबांमध्ये दररोज अगदी न चुकता नियमितपणे घरात आपले आराध्य कुलदेव, कुलदेवी यांचे पूजन केले जाते. काही ठिकाणी तर शास्त्रशुद्ध पद्धतीने घरातील देवांची पूजा केली जाते.

एकदा एक स्वामींचा भक्त स्वामींकडे जातो व तो सांगतो की स्वामी मला जप, पूजा, नामस्मरण करताना मनात खूपच वाईट विचार येतात, जप करताना ते विचार मला विचलित करतात त्यामुळे माझी खूप इच्छा असूनही मी ते नीट मनापासून करू शकत नाही. यावरती स्वामींनी अतिशय छान समजावून सांगितले.

स्वामी त्याला म्हणाले की तुझी 2 घरे आहेत, त्यापैकी एक तू स्वतः वापरतोस व दुसरं तू भाडेकरु ला दिल आहे, जर तू अचानक त्या भाडेकरूला घर सोडून जायला सांगितलं तर तो जाईल का? नाही ना? तो विरोध करेल? चिडेल, भांडण करेल किंवा मुदत मागून घेईल.

अगदी तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे. जर तू अचानक नाम, जप करण्यासाठी बसशील तर तुझ्या अंतरी असणारे षडरिपु बाहेर डोकावतील, तुला त्या चांगल्या गोष्टींपासून परावृत्त करतील, सुरुवातीला हे मानवी गुण म्हणजेच लोभ, माया, मत्सर तुला जप करताना अडथळा आणतील.

हे वाचा:   केदारनाथ मंदिराचे रहस्य..आजपर्यंत वैज्ञानिकांना देखील समजले नाही; भयंकर पूरातून मंदिर कसे टिकले.? काय आहे या धामचे रहस्य.!

परंतु जर पुन्हा पुन्हा जोमाने तू नाम जप सातत्यपूर्ण करशील तर नक्कीच मनावर ताबा मिळवशील. आणि खरंच आपलं सुद्धा असच होतंय, आपणही जपत सातत्य ठेवलं तर वाईट विचार न येता चांगले विचार सतत मनात येतील, श्रद्धा भक्ती वृद्धिंगत होईल. स्वामींचा हा उपदेश आपण नेहमी लक्षात ठेवायला हवा.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *