धान्य आपण कितीही वाळवल, बंद डब्यात ठेवलं किंवा गोणीमध्ये ठेवलं, कितीही काळजी घेतली तरीही त्याच्यामध्ये किडे पडतात, सुळ पडतात, जाळे होतात, टोके पडतात. याचा अनुभव तुम्ही बऱ्याच वेळा घेतला असेल. यामध्ये आपण विविध प्रकारचे गोळ्या, औषधे, पावडर, केमिकल, सल्फर सारखे विषारी घटक आपण वापरत असतो. ज्याचा परिणाम हा धान्यातील कीड मारण्यासाठी जरी होत असला तरी त्याचा परिणाम हा कळत नकळत आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो. तर मित्रांनो बऱ्याच घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वर्षभर लागणारे धान्य एकदाच भरून ठेवले जाते म्हणजेच साठवून ठेवले जाते.
यांना कीड, आळी किंवा जाळी लागू नयेत, खराब होऊ नयेत म्हणून आपण यात औषध किंवा गोळ्यांचा वापर देखील करतो आणि मग याचा नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून मित्रांनो कोणत्याही प्रकारचे औषध किंवा गोळ्यांचा वापर न करून आपल्या घरातील धान्ये वर्षभरासाठी जशाच तसे आणि चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी, खराब न होण्यासाठी जर तुम्ही हे घरगुती उपाय केले तर आपल्या आरोग्यावर याचा कोणताही साइड इफेक्ट देखील होणार नाही आणि वर्षभर आपले धान्य देखील चांगले राहील.
म्हणून मी तुम्हाला आज अत्यंत जबरदस्त असा उपाय सांगणार आहे. याचा जर तुम्ही वापर केला तर धान्यामध्ये कीड, सुळे, जाळे, टोके अजिबात होणार नाही आणि धान्यामध्ये जर कीड, टोके आधीच झाले असतील तर ते पूर्णपणे मारून जाईल.
मित्रांनो याच्यासाठी आपल्याला ५० किलो धान्यामध्ये २० ते २५ फळे आपल्याला ठेवायची आहेत. ही जी फळे आहेत, ती कीड मारण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. हि फळे कोणती आहेत ? याचा धान्यामध्ये आपल्याला कसा वापर करायचा आहे? आणि कोणत्या धान्यामध्ये याचा वापर करता येतो? यासर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हि पूर्ण माहिती शेवट पर्यंत वाचा. धान्य तुमच्याकडे कुठल्याही प्रकारच असेल, विशेषतः कडधान्य. गहू वगैरे जे आहेत याला हे सुळ पटकन लागतात. एकदा जर सुळ झाले तर तुम्ही परत कितीही उपाय केले तरी ते परत परत होतात.
धान्य वळवले तरी ते परत परत होतात. अशी जी कीड आहे ती मारण्यासाठी आपल्याला या फळांचा वापर करायचा आहे. हि जी फळे आहेत ती तुम्हाला रस्त्याच्या बाजूला कुठेही मिळतील. हि जी फळे आहेत ही आहेत बकान या कडुलिंबाची फळे. कडूलिंबाचे दोन तीन प्रकार असतात यामध्ये हे जे बकान कडूलिंबाचे फळ वापरायचे आहे. तुम्ही साध्या कडूलिंबाचे फळं वापरू शकता, बिया वापरू शकता.
परंतु त्यापेक्षा बकान कडुलिंबाची जी फळे आहेत हि अत्यंत गुणकारी आहेत. या फळांमध्ये बाकायानीन नावाचा कडू पदार्थ असतो. त्याचबरोबर निंगिडी असत यामध्ये आणि या निंगिडी मध्ये सल्फर हा मुख्य घटक असतो जो या किडीला पूर्णपणे मा’रून टाकतो. यामधील बाकायानीन नावाचा जो पदार्थ आहे त्याचा अगदी उग्र वास येतो किड्याना. त्यामुळे किडे धान्यामध्ये अजिबात थांबत नाही.
मित्रांनो धान्यामध्ये आधीच जर किडे झालेले असतील तर ते निघून जातात किंवा पुन्हा त्या धान्यामध्ये ते किडे येत नाहीत. सहजरीत्या आपल्याला हि बकान कडुलिंबाची फळे उपलब्ध होतात. तर हे कोणकोणत्या धान्यामध्ये तुम्ही वापरू शकता ? तर मित्रांनो, सर्व प्रकारच्या धान्यामध्ये तुम्ही या फळांचा वापर किडे मारण्यासाठी करू शकता. गहू असेल, बाजरी असेल अगदी तांदळामध्ये सुद्धा तुम्ही या फळांचा वापर करू शकता.
याचा धान्यावर कुठलाही साइड इफेक्ट होत नाही. सहजरित्या आपण एक चाळणी मारली कि हे फळ धान्यातून बाहेर निघून येते किंवा थोडस हलवलं तरी ही फळ धान्याच्या वर येतात आणि आपण सहजरित्या हि अशा प्रकारे वेगळी करू शकतो. मग दाली असतील, कडधान्य असतील, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल अशा सर्व प्रकारच्या धान्यामध्ये तुम्ही हि फळे वापरू शकता.
याच प्रमाण अशा प्रकारे घ्यायचं आहे, ५० किलो साठी २० किंवा ३० फळे घ्यायची आहेत. प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल. याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. जास्त जरी फळे तुम्ही वापरली तरी चांगलेच आहे. मित्रांनो, या फळांचा धान्य टिकवण्यासाठी तुम्ही अवश्य वापर करा. धान्याला उन्हामध्ये वाळवून त्यानंतर धान्यामध्ये हि फळे तुम्ही टाका. या फळांचा वापर करा. कीड अजिबात लागणार नाही.