प्रेमात ना जात पाहिली जात ना धर्म ना वय.प्रेम फक्त प्रेम असतं. त्यामुळे जगभरातून प्रेमाचे असे किस्से ऐकायला मिळतात की, हैराण व्हायला होतं. अनेक जुन्या प्रेमकथांची आजही चर्चा होते. अशात एका ताज्या प्रेमकथेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
ही प्रेमकथा आहे न्यूजर्सीतील. इथे 65 वर्षीय अब्जाधीश उद्योगपती त्याच्यापेक्षा वयाने अर्ध्या तरूणीच्या प्रेमात पडला. ही प्रेमकथा आता चर्चेचा विषय बनली आहे. असंही सांगितलं जात आहे की, जॉन आणि त्यांची पत्नी जेनी यांचा संसार 21 वर्ष चालला.
पण आता असं समजलं की, जॉन आपल्या पत्नीपासून अलीनामुळे वेगळे होत आहेत. किंवा काहीतरी वेगळं कारण असेल. सोबतच चर्चा अशीही होत आहे की, हा घटस्फोट फारच महागडा होणार आहे.
पॉलसन 346 अब्ज रुपयांचे मालक : पॉलसन यांची एकूण संपत्ती 4.7 बिलियन डॉलर म्हणजे 346 अब्ज रूपयांपेक्षा अधिकची आहे. असं मानलं जात आहे की, त्यांना त्यांच्या पत्नीला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. तेच अलीनाबाबत सांगितलं जात आहे की, ती न्यू जर्सीच्या मोंटक्लेअरमध्ये एक डाएट कंपनी चालवते.
दोघांनी भेट अलिकडेच झाली होती आणि त्यानंतर ते जवळ आले. चर्चा तर अशीही आहे की, पॉलसन एक फ्लॅट घेऊन अलीनासोबत काही दिवसांपासून राहत आहेत. पण दोघांनीही यावर अजून काहीच स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण चर्चा मात्र सुरू आहे.