जळगाव जिल्ह्यातील भडगाव इथे एक धक्कादायक घटना घडली आहे.एका प्रेमीयुगुलाने शाळेतच्या परिसरातच आ: त्म: ह: त्या केली आहे. कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार देताच प्रियकर प्रेयसीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली असून आधी दोन्ही कुटुंबानी यांच्या प्रेमप्रकरणाची आपल्याला माहितीच नव्हती असे म्हटले होते.
मुलाचं जिवंत असताना प्रेम न कळालेल्या घरच्यांनी मात्र मृ: त्यू नंतर स्मशानभूमीमध्ये त्याचं लग्न लावून दिलं आहे. अग्निडाग देण्यापूर्वी दोघांच्या कुटुंबीयांनी संबंधित जोडप्याचं स्मशानभूमीत विधीवत लग्न लावून देत त्यांची लग्नाची इच्छा पूर्ण केली आहे. मुकेश कैलास सोनवणे आणि नेहा बापू ठाकरे असे प्रेमीयुगुलाची नावं आहेत.
एकाच समाजातील असूनही नाते योग्य नसल्याने त्यांच्या लग्नाला घरातून विरोध होता. नेहा आणि तिचे कुटुंबीय मागील काही वर्षापूर्वी मामाच्या गावाला भडगाव तालुक्यातील वाडे याठिकाणी आले होते.नेहाची ओळख वाडे येथील रहिवासी असलेल्या मुकेशशी झाली.
काही दिवसांनी त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि नंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या चोरून भेटीगाठी सुरु झाल्या .दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली.नेहा अन मुकेश एकाच समाजाचे होते.
त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांकडून मुलीच्या घरच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण मुकेश हा नेहाचा नात्यानं चुलत मामा लागत असल्यानं मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. यानंतर नेहाच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली.
मुकेश आणि नेहाच्या प्रेमविवाहाचा आशा अशा रीतीने धूसर होत गेल्यानंतर यांनी आ: त्म: ह: त्या करण्याचा निर्णय घेतला.शाळेच्या इमारतीतील एका लोखंडी सळईला ग: ळ: फा: स लावून आ: त्म: ह: त्या केली आहे. मुकेशनं आ: त्म: ह: त्या करण्यापूर्वी स्टेटसला ‘बाय’ असं लिहिलं होतं.
यानंतर दोघांचे मृ: त: दे: ह लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. यावेळी घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नाही.शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांची एकाच वेळी पण वेगवेगळी अंत्ययात्रा काढण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी स्मशानभूमीतच दोघांचं विधीवत लग्न लावून दिलं आहे.
यावेळी गावातील अनेक नागरिक याठिकाणी उपस्थित होते. पोलिसांनी दोघांबाबत आकस्मिक मृ: त्यूची नोंद करून घेतली आहे. पोलीस या घटनेचा चहुबाजूंनी तपास करत असून जर घरच्यांनी वेळीच ऐकले असते तर ही वेळ आली नसती.