मित्रांनो मानवाला अगदी सुरवाती पासूनच खाण्याचे भारी आकर्षण आहे. त्याला नव-नवीन गोष्टी खाण्याची आवड असते. माणूस मेहनत करतो ती फक्त दोन वेळच्या पोट भर जेवणासाठी. काही ही असल तरी चालेल मात्र जेवण हे चांगलच मिळाल पाहिजे. आज आम्ही तुम्हाला ज्या वनस्पती बद्दल सांगणार आहे ते आपल्या जेवणातील स्वाद-चव एवढी वाढते की तुमच्या घरचे बोटे चाटतच राहतील. त्याचबरोबर ही आपल्या आरोग्यासाठी ही खुप उपयुक्त आहे. १०० आजारांवर हा एक उपाय आहे कढीपत्ता. कढीपत्याला कढी लिव्हस, गोड लिंब असही म्हणतात. जास्त करून साऊथ इंडियन साईडला याचा जास्त वापर केला जातो.
आपण सर्वजण सांभार बनवतो, चटणी बनवतो तेव्हा त्या मध्ये कढीपत्याच्या पानांचा वापर केला जातो. परंतु आज मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्या नंतर तुम्ही रोज या पानांचा वापर करणार आहात. मित्रांनो, कढीपत्याचे झाड तुम्ही सुद्धा तुमच्या घरी लावा. इथे तुम्हाला कढीपत्याच्या पानांना सुखवून घ्यायचे आहे आणि त्याची पावडर करायची आहे. ज्यांना ताजी पान उपलब्ध नाही होत ते सुकलेल्या पानांचा देखील वापर करू शकतात. ज्यांना शुगरचा त्रास आहे, ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे, कायम ज्यांची शुगर लेव्हल हाय असत त्यांनी रोज ८ ते १० पाने पाण्यामध्ये उकळवून त्याचे पाणी रोज प्यायले पाहिजे.
मित्रांनो, जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येमुळे खूप त्रस्त असाल तर तुम्ही कढीपत्याची २ पाने सकाळी उठून चावून चावून खायची आहेत यामुळे तुमचे केस गळणे कमी होतील. आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी दोन्ही साठी खूप गुणकारी आहे. याच्या पानांना चुरून दहिमध्ये मिक्स करून याची पेस्ट केसांना लावली तर केसांचे गळणे थांबेल, केस नॅचुरली काळे होतील, डँडरफ सुद्धा होत नाही. अशाप्रकारे आपल्या सौंदर्यासाठी कढीपत्ता खूप फायदेशीर असतो. मित्रांनो जर तुम्हाला देखील कढीपत्याच झाड लावायचं असेल तर फक्त कढीपत्त्याची एक फांदी तोडून मातीमध्ये उभी करायची आहे आपोआपच झाड वाढू लागेल.
गरमीच्या ऋतुमध्ये याला फुले व बिया येऊ लागतात. काही लोकतर याचा बियांनासुद्धा खातात. जांभळासारखे याचाही बिया दिसतात पण थोडे छोटे आणि गोड असतात. जर तुम्हाला याच्या पानांना सुकवून वापराचे असेल, तुमच्या कडे नसेल कढीपत्याचे झाड तर पानांना नीट धुवून सुकवून घ्यायचे आहे. दोन दिवसांमध्ये याची पाने सुकतात. यांची पावडर करून स्टोर करून ठेवा. जर ताजी पाने उपलब्ध असेल तर या पानांना पाण्यामध्ये उकळवून घ्या नाहीतर याची पावडर गरम पाण्यात टाकून तुम्ही पिऊ शकता किंवा याच्या पानांना सुकवून जे तुम्ही पावडर बनवलं न तीची तुम्ही हेअर मास्क बनवू शकता मेहंदी आणि दही यामध्ये १ चम्मच पावडर टाकून. ज्यांना शुगरचा त्रास आहे, जे बीपी चे पेशंट आहेत, ज्यांना वजन कमी करायचे आहे ते रोज कढीपत्त्याची चहा किंवा आपण म्हणून शकतो वेट लॉस ड्रिंक नक्की पिऊ शकता.
यासाठी आपल्याला 1 मुठभर कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत त्यांना स्वछ पाण्याने धुवून नंतर पुन्हा यामध्ये साफ पाणी टाकायचे आहे. या पाण्याला मंद आचेवर उकळवून घ्यायचे आहे. जेणेकरून यामध्ये कढीपत्त्याचे सर्व पोषक तत्व यावे. तुम्ही १५ दिवस हे ड्रिंक पिऊन बघा तुमचे बेली फॅट लवकरात लवकर निघून जाईल, वजन कमी होईल. सकाळी उपाशी पोटी गरम गरमच प्यायचे आहे. जे डा’यबीटीस पेशन्ट आहेत ते सुद्धा घेऊ शकतात यामुळे शुगर कंट्रोल व्हायला मदत होते. तुमच्या कॉन्स्टिपेशनला कमी करतं. कफ असेल तर त्याला ही दूर करत.
कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, कॉपर, आयरन, मिनरल असत आणि त्याचबरोबर यामध्ये व्हिटामन इ, व्हिटामन डी आणि व्हिटामन सी सुद्धा असतं जे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी खूप फायदेशीर असतं. ज्यांना सांधेदुखी, हाडांचे दुखणे, कंबरदुखी कढीपत्याच्या आहेत त्यांनी सुद्धा हि ड्रिंक नक्की प्यायला हवं. ज्यांना डायबीटिस आहे आणि त्यांना जर गरम प्यायचे नसेल तर ते कोमट सुद्धा पिऊ शकतात परंतु सकाळी उपाशी पोटीच प्यायचे आहे. यामुळे शुगर लवकर कमी होण्यास मदत होते. शुगर लेवल कंट्रोल मध्ये येते आणि त्याचबरोबर तुम्ही याचे सेवन सौंदर्यासाठी करत असाल तर नक्की प्या.
आपल्या केसांमध्ये लगेचच याचा फरक दिसून येईल, चेहऱ्यावर चमक येईल, पिंपल्स येणे थांबू लागेल आणि तुमची त्वचा खूप ग्लोइंग होऊन जाईल. तसेच वेट लॉस सोबतच सौंदर्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरते. मित्रांनो सुकवलेल्या पानांच्या पावडरला मुलतानी मातीमध्ये मिक्स करून १० मिनिटे लावून ठेवायचे आणि नंतर थंड पाण्याने तोंड धुवून घ्या तुम्हाला खूप फरक जाणवेल, तुमची त्वचा खूपच चमकदार होईल. तोंडावरील सर्व डाग निघून जातील आणि स्किन टाईट होईल. आहे की नाही अत्यंत साधासोपा, घरगुती आणि नॅचुरल उपाय. नक्की करून पहा हा उपाय. कारण याचा काहीही साइड इफेक्ट नाही.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.