साफसफाई करताना घरामध्ये किंवा घरासमोर काही ना काही सापडतंच. कधी आपली एखादी हरवलेली वस्तू सापडते किंवा कधी अनपेक्षित काही तरी सापडतं. अशीच घराबाहेर साफसफाई करणाऱ्या तरुणाला असं काही सापडलं ज्यामुळे त्याला धक्काच बसला.
या तरुणाला घराच्या बागेत एका बाटलीत चक्क पुरुषाचा खाजगी भाग सापडला.अर्जेंटिनाच्या बॅकर्समध्ये राहणारी व्यक्ती बागेत साफसफाई करत होती. तेव्हा त्या व्यक्तीला बागेत एक बंद बाटली सापडली, ज्यामध्ये पुरुषाचा खाजगी भाग होता. हे पाहून ती व्यक्ती हादरलीच.
घरासमोरील बागेत गवत बरंच वाढलं होतं, शिवाय दुर्गंधही येत होता. तिथं एखादा उंदीर सडला असावा असं त्या व्यक्तीला वाटलं. त्यामुळे बागेची साफसफाई करायली घेतली.बागेत वाढलेलं गवत कापत असताना त्या व्यक्तीला एक बाटली सापडली.
या बाटलीतूनच दुर्गंधी वास येत होता. या बाटलीत चक्क पुरुषाचा खाजगी भाग होता. हा मानवी खाजगी भाग कापून बाटलीत का ठेवण्यात आला, याची माहिती मिळाली नाही. काही लोकांच्या मते, हा काळ्या जादूचा प्रकार असावा.
दरम्यान पोलीस या परिसरातील रुग्णालयातही चौकशी करत आहे. तिथं एखादी व्यक्ती खाजगी भागाच्या उपचारासाठी आली असावी आणि तिचा हा खाजगी भाग असावा, असा संशय त्यांना आहे.या घटनेने तो तरुण खूप हादरून गेला आहे.