मुलांना पाहिजे असते अशीच बायको ! कारणे जाणून घ्या…

Relationship

पूर्वी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असला की मुलीला एकच प्रश्न विचारला जायचा की, “मुलीला जेवण बनवता येतं का?” मुलीला बघायला आलेल्या मुलाची देखील तशीच अपेक्षा असायची. कारण तेव्हाच काळ हा पुढारलेला नव्हता.

मुलगी लग्न करून घरी आणल्यावर तिची जबाबदारी केवळ घर आणि संसार संभाळण्यापुरती असे.मात्र आता काळ बदलला आहे आणि ज्या प्रकारे मुलींची करियर बाबतीतली ध्येये पुढारलेली आहेत तशाच मुलांच्या मुलींबाबत असलेल्या अपेक्षा देखील बदलल्या आहेत.

आता मुलांना लग्न झाल्यावर आपल्या पत्नीने केवळ चांगले जेवण बनवावे किंवा ती सुगरणच असावी अशी अपेक्षा नसते.तर त्याहीपेक्षा वेगळ्या अशा काही त्यांच्या अपेक्षा असतात ज्या आपल्या भावी पत्नीने पूर्ण कराव्यात असे त्यांना वाटत असते. आज आपण या लेखातून जाणून घेऊया की मुलीमध्ये कोणत्या अपेक्षा आजची मुले शोधत असतात.

हे वाचा:   लग्न झालेल्या महिलांकडे मुले जास्त आकर्षित का होतात ? कारणे घ्या जाणून…

खूप प्रेम करणारी पत्नी – नाते कोणतेही असो त्याचा पाया हा प्रेम असतो.  ज्या नात्यामध्ये प्रेम नसेल ते नाते खिळखिळे असते. म्हणून आपल्या पत्नीने आपल्यावर खूप प्रेम करावे अशी अपेक्षा मुलांची असते आणि ते मुलींमध्ये तेच शोधत असतात. अनेकदा असे होते की पतीचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम असते, पण काही कारणास्तव पत्नी मात्र आपल्या पतीला तेवढे प्रेम देऊ शकत नाही.

आत्मनिर्भर आणि जबाबदार –  आजच्या मुलांची अपेक्षा असते की लग्नानंतर आपण जेवढी जबाबदारी उचलतो तेवढीच जबाबदारी आपल्या पत्नीने देखील उचलली पाहिजे. पूर्वी मुलीला लग्न करून घरी आणले म्हणजे तिची सर्व जबाबदारी मुलाला उचलावी लागे. अर्थात तेव्हा मुलींकडे स्वत: आत्मनिर्भर होण्यासाठी आणि स्वत:हून घराची जबाबदारी उचलण्याची साधने नव्हती.

हे वाचा:   अशा मुलांकडे खूप आकर्षक होतात सुंदर मुली आणि स्त्रिया.. त्यांच्यासाठी वेडया होतात स्त्रिया.. कारण ते त्यांचासाठी..

पालकांवर प्रेम – ही एक भावनात्मक अपेक्षा आहे जी प्रत्येक मुलाला आपल्या भावी पत्नीकडून असते. ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलं, त्यांना सांभाळण्याची वेळ आता आपली आहे आणि त्यात आपल्या पत्नीने आपल्याला सपोर्ट केला पाहिजे आणि स्वत:च्या सासू सासऱ्यांवर स्वत:च्या आई वडिलांप्रमाणे प्रेम केलं पाहिजे अशी अपेक्षा मुले करतात

खंबीर स्त्री – जीवन हे खूप अनपेक्षित आहे हे आपण सर्व जाणतोच. कधी कोणती समस्या समोर आ वासून उभी ठाकेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मुलांना वाटते की आपल्या पत्नीने कोणत्याही संकटात सक्षम आणि खंबीर राहिले पाहिजे. उद्या तिच्यावर पूर्ण घराची जबाबदारी पडली तरी तिने ती पार पाडली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *